![]() |
यशवंतनगर (ता. चंदगड) येथे प्रचार सभेत बोलताना आघाडीचे उमेदवार राजेश पाटील. |
चंदगडची जनता स्वाभीमानी आहे. ती आपल्या हक्काचा उमेदवार निवडुन देतील यात शंका नाही. पुरोगामी विचारांचा वारसा असलेल्या चंदगड-आजरा-गडहिंग्लज तालुक्यात होणारी विधानसभेची निवडणुक ही वैचारिक निवडणुक होणार आहे. कै. नरसिंगराव पाटील व कै. बाबासाहेब कुपेकर यांनी चालविलेला तीन तालुक्यांच्या विकासाचा गाढा सर्वसामान्य जनतेच्या बळावरच पुढे नेण्यास कटीबध्द राहीन असा विश्वास काँग्रेस-राष्ट्रवादी व मित्रपक्षाचे उमेदवार राजेश पाटील यांनी व्यक्त केला. यशवंतनगर (ता. चंदगड) येथे आयोजित केलेल्या प्रचार सभेत ते बोलत होते.
![]() |
प्रचार सभेला उपस्थित समर्थक. |
प्रारंभी प्रास्ताविक शिवानंद हुंबरवाडी यांनी करुन चंदगड विधानसभा मतदारसंघात राजेश पाटील यांच्या रुपाने नवीन चेहरा निवडणुक लढवत आहे. विकासाची जाण असलेला हा उमेदवार निवडणुक आल्यास तीन्ही तालुक्यातील विकासाची प्रलंबित कामे पुर्ण होतील असे सांगितले. राजेश पाटील पुढे म्हणाले, ``हि निवडणुक जनतेनेच हातात घेतली आहे. असल्याने चंदगड-आजरा-गडहिंग्लज तालुक्यात प्रलंबित असलेल्या विकासकामांची मला जाण आहे. त्यामुळे हि निवडणुक मी विकासाच्या मुद्यावर लढवत आहे. पक्षाचे नेते शरद पवार यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण आहे. त्यांच्या मार्गदर्शनाने चंदगड मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी कटीबध्द असल्याचे त्यांनी सांगितले.`` यावेळी स्वाभीमानीचे राजेंद्र गड्याण्णावर यांनी ``शरद पवार यांना जशी शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण आहे. तशीच जाण स्वाभीमानीचे नेते राजू शेट्टी यांना आहे. या दोन्ही नेत्यांच्या एकत्र राहण्यामुळे यावेळी राज्यात आघाडीचेच सरकार येणार असल्याचे सांगितले.``
यावेळी मुकुंद देसाई, गंगाधर व्हसकोटी, तानाजी देसाई, माजी सभापती जगन्नाथ हुलजी, प्रा. किसनराव कुऱ्हाडे, जयवंतराव शिंपी, अमर चव्हाण, विष्णु पाटील, गडहिंग्लज उपसभापती विद्याधर गुरबे, प्रा. सुभाष जाधव, सोमगोंडा अरबोळे, प्रा. दिपक पाटील, तात्यासो देसाई, अल्बर्ट डिसुझा आदींनी मनोगते व्यक्त केली. यावेळी गडहिंग्लजचे विजय पाटील, आजऱ्याचे सभापती रचना होलम, नामदेव नार्वेकर, शिवप्रसाद तेली, अली मुल्ला, भिकु गावडे, ज्योती पाटील, सौ. सुश्मित पाटील, महादेव प्रसादे, तानाजी गडकरी, विष्णु पाटील आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते. उदय जोशी यांनी आभार मानले.
खासदार अमोल कोल्हेची अनुपस्थिती.............
No comments:
Post a Comment