![]() |
कोल्हापूर विभागीय मैदानी स्पर्धेत यशस्वी ठरलेले कोवाड महाविद्यालयाचे विद्यार्थी, सोबत मार्गदर्शक आर. टी. पाटील व मान्यवर |
कालकुंद्री / प्रतिनिधी
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या मैदानावर 9 ते 11 ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या कोल्हापूर विभागीय मैदानी स्पर्धेत कोवाड तालुका चंदगड येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थी वल्लभ रामचंद्र पाटील याने 100 मीटर स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून स्पर्धेतील सर्वात वेगवान धावपटू ठरला. त्याने 200 मीटर धावणे स्पर्धेतही रौप्य पदक पटकावले याशिवाय महाविद्यालयाच्या शार्दुल सुनील ससे याने 110 मीटर अडथळा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. मुलींच्या विभागात सायली अर्जुन वांद्रे हीने चारशे मीटर अडथळा स्पर्धेत कास्यपदक तर प्रतिभा अप्पाजी पाटील हिने लांब उडी विभागात कास्य पदक पटकावले. या सर्व खेळाडूंची आंतरविभागीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यांना क्रीडा शिक्षक प्रा. आर. टी. पाटील व नामदेव जा.पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थाध्यक्ष डॉ.ए. एस. जांभळे, सचिव एम. व्ही. पाटील, ज्योतिबा वांद्रे यांच्यासह सर्व संचालक व प्राचार्य एस. एम. पाटील आदींचे प्रोत्साहन लाभले.
No comments:
Post a Comment