जरळीमध्ये अशोक चराटीच्या प्रचाराला प्रतिसाद - चंदगड लाईव्ह न्युज

13 October 2019

जरळीमध्ये अशोक चराटीच्या प्रचाराला प्रतिसाद

जरळी (ता. गडहिंग्लज) येथे जनसुराज्य पक्षाचे उमेदवार अशोक चराटी यांच्या प्रचारावेळी उपस्थित नागरीक.
आजरा / प्रतिनिधी
निवडणुकीनंतर प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघात महिलांसाठी गारमेंट प्रकल्प सुरू करणार आहे, जे बोलतो तेच करतो. त्यामुळे आजरा परिसराचा विकास करण्यात यशस्वी झालो. गारमेंट प्रकल्पाबरोबर पाटबंधारे प्रकल्प पुर्ण करुन नांगनुर कडलगे बंधाऱ्यापर्यंत चोवीस तास पाणी सोडणार आहे असे प्रतिपादन चंदगड विधानसभा मतदारसंघाचे जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार अशोकअण्णा चराटी यांनी केले. जरळी (ता. आजरा) येथील प्रचारसभेत बोलत होते. अध्यक्षस्थानी गोडसाखरचे उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण होते.
आजऱ्याप्रमाणे जरळी परिसराचाही विकास करणार आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता अशोक अण्णांच्या पाठीशी राहूया असे आवाहन कृष्णा बागडी यांनी केले. मेळाव्याला शिवमुर्ती फुंदे, कृष्णा बागडी, अभय कुलकर्णी, आनंदा कांबळे, ओंकार कुलकर्णी, संजय पाथरवट, शिवगोंडा अंकलीकर, इराप्पा नावलगी, सुभाष पांढरे, श्रीकांत शिंदे, वडर समाजाचे अध्यक्ष मारुती पाथरवट, उपाध्यक्ष महेश पाथरवट, हिरण्यकेशी बचत गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते. 
दरम्यान अशोक चराटी यांच्या प्रचारार्थ भडगाव गावातून उत्फूर्तपणे प्रचाररॅली काढून त्यांना पाठींबा देणेत आला. भडगाव येथील प्रचाररॅलीत मल्लिकार्जुन शिंत्रे, रविंद्र शेंडूरे, बसवराज बंदी, कुमार चोगुले, महेश हासुरे, अशोक चेतामिरे, रविशंकर बंदी, शिवाजी करमुपे, बसाप्पा रेगडे, आपय्या स्वामी, सुरेश देसाई, महादेव कोरी, शिवानंद कोडोली, कुमार कोडोली, शिवाजी पाटील, बशीर शेख, दस्तगीर शेख, मारुती मुळगळी, राजू कोरी, आप्पासो बिरंजे, काका तराळ, दयानंद कोळकिरी, काशीनाथ मरमुदी, सचिन मरमुदी, सुभाष चौगुले, अमर चिणमुरे, कुमार बंदी यासह कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. 

No comments:

Post a Comment