प्रत्येक जि. प. मतदारसंघात गारमेंट प्रकल्प उभारणार – अशोक चराटी, हसुरचंपु व दुंडगेतील येथील प्रचाराला प्रतिसाद - चंदगड लाईव्ह न्युज

14 October 2019

प्रत्येक जि. प. मतदारसंघात गारमेंट प्रकल्प उभारणार – अशोक चराटी, हसुरचंपु व दुंडगेतील येथील प्रचाराला प्रतिसाद

गडहिंग्लज तालुक्यातील हसुरचंपु व दुंडगे गावातून प्रचारफेरीवेळी उपस्थित कार्यकर्ते. 
गडहिंग्लज / प्रतिनिधी
चंदगड विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या चंदगड, आजरा व गडहिंग्लज तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघात गारमेंट प्रकल्प उभारुन महिलांच्या हातांना रोजगार उपलब्ध करुन देणार अशी ग्वाही चंदगड विधानसभा मतदारसंघातून निवडणुक लढवत असलेले जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार अशोकआण्णा चराटी यांनी दिली. गडहिंग्लज तालुक्यातील हसुरचंपु व दुंडगे गावातील प्रचारफेरी दरम्यान ते बोलत होते. 

उमेदवार अशोकअण्णा चराटी पुढे म्हणाले, `` मी छोटा कार्यकर्ता आहे.मोठा नाही. परिस्थितीप्रमाणे वागलो म्हणून आण्णा भाऊ संस्था समूह राज्यात आदर्शवत करु शकलो. विकासासाठी अहोरात्र काम करून या  मतदार संघाचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही.चित्रीप्रमाणे आंबेओहोळ, उचंगी व सर्फनाला प्रकल्प सुरू करुन नांगणूरपर्यंत 24 तास पाणी देण्याची व्यवस्था करणार आहे.`` यावेळी हसुरचंपु परिसरातुन  जास्तीत –जास्त मताधिक्य देवू असे माजी सभापती जयश्री तेली यांनी सांगितले.  विकासातून मोठा झालेला कार्यकर्ता अशोकअण्णा  चराटी त्याना  आमदारकीसाठी निवडून देवूया असे  प्रकाश चव्हाण यांनी सांगितले. 


No comments:

Post a Comment