चंदगड / प्रतिनिधी
चंदगड-आजरा, गडहिंग्लज तालुक्यातील प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने या विधानसभा निवडणुकी पार्श्वभूमीवर आपल्या विविध प्रकारच्या मागणीसाठी पुन्हा एकदा लक्ष वेधले आहे.
संजय गांधी निराधार योजनाच्या अध्यक्ष पदी दिव्यांगांची निवड करण्यात यावी, प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये दिव्यांगाना आरक्षण मिळावे, दिव्यांग,विधवा, निराधार, शेतमजूर ईतराना किमान पाच हजार रुपये मासिक पेन्शन मिळावी.अत्योदय रेशनकार्ड प्राधान्याने मिळावे, घरकुल योजनेची त्वरित आंमलबजावणी करावी, वीज बीलात पन्नास टक्के सवलत मिळावी, पेन्शन साठीच्या जाचक अटी रहद्ध कराव्यात,शासनदरबारी दिव्यांच्या मागण्यांसाठी जाणाऱ्यांंचा मान-सन्मान ठेवावा, एस.टी. प्रवास कायमस्वरुपी मिळावे, व तसे कार्डवर नोंद व्हावे,वार्षिक उत्पन्न पन्नास हजार रुपये करावे, एम.आय.डी.सी मध्ये किमान पंचवीस गुंठे जमीन व्यवसायासाठी उपलब्ध करून मिळावे, साठ वर्षावरील शेतकऱ्यांना पेन्शन मिळावी अशा मागण्या प्रसिद्धी पत्रकातुन केल्या आहेत.
No comments:
Post a Comment