मौजे कार्वेच्या तंटामुक्त अध्यक्षपदी मारुती राऊत उपाध्यक्षपदी शिवाजी कानूरकर यांची निवड - चंदगड लाईव्ह न्युज

15 October 2019

मौजे कार्वेच्या तंटामुक्त अध्यक्षपदी मारुती राऊत उपाध्यक्षपदी शिवाजी कानूरकर यांची निवड

मारुती राऊत                               शिवाजी कानुरकर
मजरे कार्वे / प्रतिनिधी
मौजे कार्वे (ता. चंदगड) ग्रामपंचायतीची ग्रामसभा नुकतीच मोठ्या उत्साहात संपन्न झाली. सरपंच जोतिबा आपके अध्यक्षस्थानी होते. ग्रामसेवक श्रीधर भोगण यांनी विषयपत्रिकेवरील सर्व विषय वाचून दाखविले. सर्व विषय खेळीमेळीच्या वातावरणात संमत करण्यात आले. या सभेत सन 2019 -20 या साला करिता तंटामुक्त समिती गठीत करण्यात आली. गावातील सर्व थरातून सदर सभेमध्ये या कमिटी ची स्थापना करण्यात आली. तंटामुक्त अध्यक्षपदी मारुती नारायण राऊत यांची तर उपाध्यक्षपदी शिवाजी नागोजी कानूरकर यांची बिनविरोध एकमताने निवड करण्यात आली.

No comments:

Post a Comment