![]() |
चनेकुपी येथे उमेदवार अशोकआण्णा चराटी यांचा प्रचार करताना जनसुराज्य शक्ती पक्षाचे कार्यकर्ते. |
गडहिंग्लज / प्रतिनिधी
चंदगड विधानसभा मतदारासंघात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी मी निडणुकीला उभा आहे. प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघात गारमेंट प्रकल्प उभे करुन महिलांना स्वाबलंबी बनविणार आहे. मतदारसंघात सुशिक्षित युवकांची संख्या मोठी आहे. मात्र त्यांच्या हाताला काम नसल्याने ते बेरोजगार आहेत. या युवकांच्या व महिलांच्या हाताला काम देणार असल्याचे ग्वाही चंदगड विधानसभा मतदारसंघाचे जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार अशोकआण्णा चराटी यांनी दिली. गडहिंग्लज, चंदगड, आजरा विधानसभा मतदार संघातील जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार अशोकअण्णा चराटी चन्नेकुपी येथील प्रचार सभेत बोलत होते.
गडहिंग्लज तालुक्यातून अशोकअण्णा चराटी यांना जास्तीत-जास्त मताधिक्य देण्यासाठी जीवाचे रान करणार असल्याचे गोडसाखरचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांनी सांगितले. भडगांव, बेरडवाडी, मुगळी, जरळी, शिंदेवाडी, खमलेट्टी, तनवडी, हणमंतवाडी, चिंचेवाडी, चन्नेकुप्पी, हुनगीनहाळ, हरळी बु., हरळी खु., वैरागवाडी, हसूरवाडी, सासगिरी, महागांव, उंबराडी या गावातून पदयात्रा व कोपरा मेळाव्यातून अशोकअण्णा चराटी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. चन्नेकुपीतील प्रचाररॅलीत प्रकाश चव्हाण, गणपती सावंत, शिवाजी भदरगे, राजाराम कतार, बबन आयर, तुकाराम कुरळे, रविंद्र इंचनाळकर, सुरेश निकम, बाळू चव्हाण, ईश्वर माने, पप्पू इंचनाळकर, भिमराव सुतार, राजाराम सुतार, आप्पा सावंत, राजाराम पोवार, महादेव पोवार, तानाजी निकम, सुबाना शेलार, बाबू शेलार, विजय मुसळे, आनंदा जाधव, सुरेश कांबळे, दुंडाप्पा कांबळे, गिरीष कांबळे, लक्ष्मण भदरगी, भरत भदरगी, रमेश माने, राजाराम माने उपस्थित होते. खमलेट्टीत प्रचाररॅलीत बाबूराव चौगले, मारूती माने, आप्पासो माने, प्रकाश माने, महादेव माने उपस्थित होते. हरळीखुर्दमधील प्रचार रॅलीत सरपंच उर्मिला पाटील, तंटामुक्त अध्यक्ष सिताराम पाटील, माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य सुवर्णा कुंभार, आनंदराव नाईक, अनिता बादरेस्कर, महादेव तेली, रामदास कुंभार, सुरेखा कुंभार, राजाराम कुंभार, राजाराम गोंदुकुप्पे, दशरथ गोंदुकुप्पे, विजयमाला कट्टीकर, शांताबाई कानडे, शोभा पाटील, मनीषा पाटील सहभागी झाले होते. मुगळीतील प्रचार रॅलीत रमेशआण्णा आरबोळे, रायगोंडा पाटील, सुबराव जगदाळे, वसंत मुसळे, माजी सरपंच राजू चौगले, मारूती घस्ती, चंद्रकांत भोसले, उपसरपंच आण्णासो चौगले, आप्पासो पाटील, आण्णासो माने, शामकांत शिंदे, गुरूपाद कांबळे, दंडाप्पा पाटील, संजय जाधव सुधाकर शिंदे, हणमंतराव कुलकर्णी, शंकर आरबोळे, दुंडेस माने, भिमा आरबोळे, आप्पासो धुळाज, नितीन वाघ, उमेश जाधव हे प्रचारसभा व प्रचाररॅलीत सहभागी झाले होते. हासूरवाडीतील पदयात्रेत शंकर चव्हाण, बाळासाहेब पाटील, गुंडू पाटील, हसबे, शाहू वारावत, आप्पासाहेब सिध्दार्थ, बंडू घोटणे सहभागी झाले होते. हासूर सासगिरीत संजय देसाई, विष्णूपंत कदम, सरपंच शांता कदम, बाळासाहेब देसाई, बळवंत कोरे, रमेश मिसाळ, बळवंत शिंदे, बाबूराव नाईक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment