विधानसभा निवडणुक काळात कोल्हापूर जिल्ह्यात तीन दिवस मद्य विक्री बंद - जिल्हाधिकारी दौलत देसाई - चंदगड लाईव्ह न्युज

15 October 2019

विधानसभा निवडणुक काळात कोल्हापूर जिल्ह्यात तीन दिवस मद्य विक्री बंद - जिल्हाधिकारी दौलत देसाई


कोल्हापूर / प्रतिनिधी
मतदान प्रक्रिया संपण्याच्या 48 तासापूर्वी सायंकाळी 6 वाजल्यापासून, मतदानाच्या  अगोदरचा संपूर्ण दिवस, मतदाना दिवशी मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आणि मतमोजणीचा संपूर्ण दिवस असे तीन दिवस मद्य विक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिले, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक गणेश पाटील यांनी दिली.
जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघात 21 ऑक्टोबर रोजी मतदान व 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुका खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरीता लोक प्रतिनिधित्व आदी नियम 1951 च्या कलम 135 (सी) अन्वये तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्र दारु बंदी कायदा 1949 मधील महाराष्ट्र विदेशी मद्य (रोखीने विक्री, विक्रीच्या नोंद वह्या इ.) नियम 1969 मधील 9 (अ) (2) (क), महाराष्ट्र देशी दारु नियम 1973 मधील नियम 26 (1) (क), विशेष परवाने व अनुज्ञप्ती नियम 1952 मधील नियम 5 (10) (ब) (क) तरतुदींच्या अन्वये कोरडा दिवस जाहीर करण्यात येत आहे. दि. 19 ऑक्टोबर मतदानाच्या अगोदरच्या अगोदरचा दिवस सायंकाळी 6 वाजल्यापासून बंद राहील (मतदान प्रक्रिया संपण्याच्या 48 तासापूर्वी) 20 ऑक्टोबर मतदानाच्या अगोदरचा दिवस संपूर्ण दिवस बंद राहील. 21 ऑक्टोबर मतदानाच्या दिवशी मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आणि 24 ऑक्टोबर मतमोजणीचा दिवस संपूर्ण दिवस बंद राहील. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित अनुज्ञप्ती धारकाविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment