चंदगड तालुक्यात पुरपरिस्थिती निर्माण झाल्यानंतर पुरग्रस्तांना मदत करण्यासाठी केवळ शिवसैनिकच धावून आले होते. संकटावेळी धावून जाण्याचे काम केवळ शिवसैनिकच करु शकतो. त्यामुळे यावेळी या मतदारसंघात नक्कीच भगवा फडकणार असा विश्वास शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना व्यक्त केला. हलकर्णी (ता. चंदगड) येथे महायुतीचे उमेदवार संग्राम कुपेकर यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या प्रचार सभेत ते बोलत होते.
शिवसेनेमध्ये निष्ठावंत कार्यकर्ते विधानसभेची तयारी करत असतात. मात्र पक्षाचा आदेश आल्यानंतर पक्षनिष्ठा दाखवतात. या विधानसभेला सहसंपर्क प्रमुख प्रा. सुनिल शिंत्रे व उपजिल्हा प्रमुख प्रभाकर खांडेकर यांनी हे दाखवून दिले आहे. सत्ता आल्यानंतर या दोघांना नक्कीच मानसन्मान देणार असे सांगून ते पुढे म्हणाले, ``हि निवडणुक जनतेनेच हातात घेतली आहे. त्यामुळे यश नक्कीच मिळणार. काँग्रेस-राष्ट्रवादीतील उमेदवार हे हरलेल्या निवडणुकीतील बडे नेते आहेत. त्यांच्याकडे कणखर विचाराशी बांधील असलेल्या माणसांची उणीव आहे. त्यामुळे त्याचा या निवडणुक पराभव निश्चित आहे. निवडणुकीच्या निमित्ताने निर्माण झालेली बांडगुळे झाटण्याचे काम तुम्हालाच करावे लागणार आहे. यावेळी संजयबाबा घाटगे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, सौ. संज्योती मळवीकर, ॲड. संतोष मळविकर, भरमाणा गावडे, एकनाथ कांबळे यांनी मनोगते व्यक्त केली. खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, शांता जाधव, शारदा घोरपडे, भैयासाहेब कुपेकर, दिलीप माने, अशोक मनवाडकर, अनिल दळवी, रंजना शिंत्रे, राजू सावंत यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
युती काळात सुरवात झालेले उंचगी व आंबेओहोळ हे दोन्ही प्रकल्प आघाडी सरकारने अर्धवट अवस्थेत ठेवले आहेत. संग्रामला निवडून द्या, हे दोन्ही प्रकल्प पुर्ण करण्याची जबाबदारी मी घेतो असे आश्वासन दिले.
No comments:
Post a Comment