नेसरीतून अशोक आण्णांना मताधिक्य देणार - साखरे
![]() |
जनसुराज्य पक्षाचे उमेदवार अशोकआण्णा चराटी यांनी प्रचारफेरी काढली. यावेळी सहभागी झालेले कार्यकर्ते. |
गडहिंग्लज / प्रतिनिधी
या मतदार संघातील जनतेच्या अनेक समस्या आहेत. अनेक गावांचा विकासही झालेला नाही. चंदगड, आजरा, गडहिंग्लज मतदार संघावर असणारा मागासलेपणाचा शिक्का पुसून काढून या भागाचा विकास केला जाईल असेही आश्वासन उमेदवार अशोकअण्णा चराटी यांनी दिले. गडहिंग्लज, चंदगड, आजरामधील जनता माझ्याच पाठीशी असलेने माझा विजय निश्चीत आहे. महिलांना गारमेंटच्या माध्यमातून रोजगार मिळवून देणार असल्याने या विधानसभा मतदार संघातील महिला सक्षम करून त्यांना स्वावलंबी केले जाईल असे स्पष्ट प्रतिपादन जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार अशोकअण्णा चराटी यांनी केले. नेसरी जि . प . मधील विविध गावातील कार्यकर्ता व जनतेच्या गाठीभेटी व पदयात्रेतून आयोजित कोपरा सभेत बोलत होते.

नेसरी, अर्जुनवाडी, सांबरे, कुमरी, बिद्रेवाडी, हेब्बाळ जलद्याळ, सरोळी, वाघराळी, मुंगूरवाडी, तेगीनहाळ, बुगडीकट्टी, कवळीकट्टी या गावातून पदयात्रा काढून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. आजरा, गडहिंग्लज, चंदगड विधानसभेची निवडणूक जनतेनेच हातात घेतल्याने व जनताच माझ्या पाठीशी आहे. त्यामुळे माझा विजय निश्चित आहे. अशोकअण्णांचे प्रत्येक गावात महिलांनी औक्षण करून स्वागत केले तर वयोवृध्दांनी आशिर्वाद दिले. आजऱ्या प्रमाणेच नेसरी भागाचा विकास करून स्वच्छ व मुबलक पाणी देण्याचे आश्वासनही प्रत्येक गावातील प्रचारफेरीतून अशोकअण्णा चराटी यांनी दिले. नेसरीमधून प्रचारफेरीत विरशैव बँकेचे चेअरमन महादेवआण्णा साखरे, सरपंच आशिष साखरे, भिकाजी दळवी, संजय कोरी, शाम नाईक सांबरेमधून दयानंद भादवणकर, संजय जाधव, संजय बोरगल्ली, कुमरीमधून सरपंच कृष्णा नाईक, शोभा पाटील तसेच अर्जुनवाडी येथील प्रविण पाटील, महिला बचतगट व कार्यकर्ते पदयात्रेत सहभागी झाले होते.
No comments:
Post a Comment