तुर्केवाडी येथील महादेवराव बी. एड. काॅलेजमध्ये वाचन प्रेरणा दिन - चंदगड लाईव्ह न्युज

18 October 2019

तुर्केवाडी येथील महादेवराव बी. एड. काॅलेजमध्ये वाचन प्रेरणा दिन

तुर्केवाडी येथील महादेवराव बी. एड. काॅलेजमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित शिक्षक.
दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
भारतरत्न डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम यांच्या  जन्मदिनानिमीत्त तुर्केवाडी (ता. चंदगड) येथील महादेवराव बी. एड. काॅलेजमध्ये  "वाचन प्रेरणा दिन" साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी काॅलेजचे प्रभारी प्राचार्य एन. जी. कांबळे होते. 
प्रास्ताविक एम. आर. मुल्ला व प्रशिक्षणार्थी शैला आढाव यांनी केले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून काॅलेजचे संस्थापक महादेवराव वांद्रे, प्राचार्य एस. आर. सानवेकर, फार्मसी काॅलेजचे प्राचार्य डाॅ. एस. एम. माळी उपस्थित होते. मार्गदर्शक जी. जी. प्रधान यांनी डाॅ. ए. पी. जे.अब्दुल कलाम  यांच्या जिवनातील विविध पैलू व वाचनाचे मानवी जीवनातील महत्व पटवून दिले. प्रशिक्षणार्थींना वाचन संस्कृतीचा लोप नकरता तिचे संवर्धन प्रसार करा व समृद्ध ग्रंथालय सुसंस्कारीत व ज्ञानविश्वासू विद्यार्थी घडवू शकतात असे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष एन. जी. कांबळे यांनी केले. कार्यक्रमाप्रसंगी प्रथम वर्षांतील प्रशिक्षणार्थींचे स्वागत करण्यात आले. डाॅ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या  पुस्तकाचे वाचन, ग्रंथ प्रदर्शन, भितीपत्रिका उदघाटन, वाचन प्रेरणा दिनाच्या लोगोचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी प्रसाद सावंत, नानाजी मरगाळे यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी ग्रंथपाल व्ही. पी. गुरव, श्रीमती एम. आर. देशपांडे, परशराम काजिर्णेकर उपस्थित होते. आभार विनायक सावंत यांनी मांडले.



No comments:

Post a Comment