चंदगड विधानसभात मतदारसंघातील प्रचारासाठी उमेदवारांच्याकडे केवळ एक दिवश शिल्लक राहिल्याने उमेदवारा पायाला भिंगरी लागल्यासारखे रात्रीचा दिवस करत आपली भूमिका पटवून देण्यासाठी गावोगावी संपर्क करत आहेत. प्रचारासाठी चंदगड विधानसभा मतदार संघातील जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार अशोकअण्णा चराटी यांना पाठींबा देणेसाठी हजारोंच्या संख्येने युवकांनी मोटरसायकल रॅली काढली.
 |
उमेदवार अशोकअण्णा चराटी यांच्या प्रचार करताना कार्यकर्ते. |
प्रचारासाठी मोटरसायकल रॅलीची सुरूवात मुरूडे येथून झाली. मुरूडे, बुरूडे, भटवाडी, बोलकेवाडी, मेंढोली, होणेवाडी, हत्तीवडे, पेद्रेवाडी, कोवाडे, निगुडगे, सरोळी, मलिग्रे, कागिनवाडी, कोळींद्रे या गावातून शक्तीप्रदर्शन करून युवकांनी प्रचारफेरी काढली. गडहिंग्लज, चंदगड, आजरा विधानसभा मतदार संघातील प्रत्येक गावांचा विकास करणेसाठी अशोकअण्णा चराटी यांना निवडून देण्याचे आवाहन केले. विकासाचा ध्यास घेतलेला धडाडीचा कार्यकर्ता म्हणजे अशोकअण्णा चराटी असून युवकांबरोबर महिलांसाठी रोजगार देण्यासाठी अशोकअण्णा चराटी यांना विजयी करण्याचे आवाहन यावेळी कार्यकर्त्यांनी मतदारांना केले. कोळींद्रे जिल्हा परिषद मतदार संघातील प्रत्येक गावात जावून घरोघरी प्रचार केला. मोटरसायकल रॅलीत आजरा अर्बन बँकेचे अध्यक्ष सुरेश डांग, संचालक डॉ. दीपक सातोसकर, विजयकुमार पाटील, डॉ. अनिल देशपांडे, प्रकाश वाटवे, तुकाराम डोंगरे, नंदू देसाई, विनय सबनीस, धोंडीबा रेडेकर, धोंडीबा बोलके, दशरथ बागवे सहभागी झाले होते.
No comments:
Post a Comment