चंदगड तालुक्यात दुपारनंतर पावसाची रिपरिप, प्रचारात अडथळा - चंदगड लाईव्ह न्युज

18 October 2019

चंदगड तालुक्यात दुपारनंतर पावसाची रिपरिप, प्रचारात अडथळा


चंदगड / प्रतिनिधी
शहर परिसरात आज दुपारनंतर पावसाची रिपरिप सुरु आहे. दुपारी तीन वाजल्यानंतर पावसाची रिपरिप सुरु झाली. सायंकाळपर्यंत पावसाची रिपरिप सुरुच होती. त्यामुळे वातावरणात कमालीचा गारवा जाणवत होता. या पावसामुळे शेवटच्या टप्यात आलेल्या प्रचाराला मात्र काहीसा ब्रेक लागला आहे. उमेदवारांना मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी केलेले दिवसभराचे नियोजन कोलमडले आहे. अनाचक दुपारनंतर आलेल्या पावसामुळे रॅली, कोपरा सभा व थेट संपर्कातून प्रचार थंडावला. मात्र रात्री पाऊस थांबल्यानंतर प्रचार यंत्रणा आणखी गतीमान झाली आहे. सद्यस्थितीला पिके परिपक्व होण्याच्या अवस्थेत असल्याने त्यामुळे हा पाऊस पिकांना मारक ठरत आहे. दिवसभर कडक ऊन पडल्याने पाऊस पडणार हे सकाळीच जाणवत होते. दुपारनंतर पडलेल्या पावसाच्या हलक्या सरींनी संपुर्ण वातावरणात गार झाल्याने थंडी जाणवत होती. 


No comments:

Post a Comment