![]() |
राजेश नरसिंगराव पाटील |
राष्ट्रवादी, काँग्रेस,स्वाभिमानी शेतकरी संघटना व मित्रपक्षांचे उमेदवार राजेश नरसिंगराव पाटील यांच्या प्रचारार्थ प्रचार सभेचे नियोजन करण्यात आले आहे. नेसरी (ता. गडहिंग्लज) येथील कोवाड रोडलगत असणाऱ्या विठ्ठल दिप हॉलमध्ये सकाळी अकरा वाजता सभा होणार आहे. या सभेला राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक अमोल मिटकरी, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादीचे गडहिंग्लज तालकाध्यक्ष रामाप्पा करिगार, आजऱ्याचे मुकंद देसाई, उदय जोशी, अमर चव्हाण, विद्याधर गुरबे, जयकुमार मनोळी, महाबळेश्वर चौगुले, शिवप्रसाद तेली, सभापती रचना होलम, सभापती विनायक पाटील आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत . तरी या सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी पक्षाकडून करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment