
बुझवडे (ता. चंदगड) येथे भूमीपूजन करताना मान्यवर.
चंदगड / प्रतिनिधी
बुझवडे (ता. चंदगड) येथे रविवारी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान' आणि 'मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (SMART)' प्रकल्पांतर्गत आम्ही चंदगडी महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या इमारतीचा भूमीपूजन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. मान्यवरांच्या उपस्थितीमुळे या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाला.
![]() |
| कार्यक्रमाला उपस्थित महिला |
या प्रकल्पाचे भूमीपूजन चंदगड पंचायत समितीच्या सभापती विलास नाईक, गटविकास अधिकारी (BDO) वृषाली यादव, पंचायत समिती सदस्य रवी बांदिवडेकर, भाजपा संयोजक चंदगड तालुका भारती जाधव, पंचायत समिती सदस्य सौ. मनस्वीनी कांबळे, जांबरे गावचे सरपंच विष्णू गावडे, दयानंद पाटील, संतोष पाटील, नारायण धामणेकर, अनंत झेंडे, कंपनीच्या अध्यक्ष अन्विता झेंडे, सचिव अनिता लाड यांच्या हस्ते संपन्न झाले.
![]() |
| कार्यक्रमावेळी बोलताना सभापती विलास नाईक |
यावेळी सभापती विलास नाईक म्हणाले, "महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक बळकट होईल. महिला उद्योजक बनत आहेत. हे समाजाच्या उन्नतीच्या दिशेने टाकलेले मोठे पाऊल आहे. महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी हि कंपनी नक्कीच फायद्याची ठरेल. महिला ज्या प्रमाणे कुटुंबांचे उत्तम नियोजन करुन संसार करतात. त्याप्रमाणे उद्योगामध्येही त्या भरभराट करतील असा विश्वास व्यक्त करुन उपक्रमाचे कौतुक केले.``
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा अभियान व्यवस्थापक दयानंद पाटील, तालुक्यातील तालुका अभियान व्यवस्थापक सूर्यकुमार सावंत भोसले, प्रभाग समन्वयक राकेश पाटील, FPC सर्व संचालक पशु व्यवस्थापक निखिल कडुकर, प्रभागातील सर्व ग्रामसखी, कृषी सखी, पशु सखी, बँक सखी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजश्री 'धामनेकर यांनी केले. मान्यवराचे स्वागत सारिका घोळसे यांनी केले. तसेच या कार्यक्रमाला उपस्थित घटप्रभा प्रभाग संघातील बचत गटातील महिला, भागधारक, सभासद व मान्यवरांचे भारती पाटील यांनी आभार मानले.


No comments:
Post a Comment