कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
कोल्हापूर जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघ शाखा चंदगड च्या वतीने चंदगड तालुक्यातील गेल्या वर्षभरात वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक सभासदांचा संपत्नीक गौरव समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
मजरे कार्वे (ता. चंदगड) येथील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांनी बांधलेल्या विरंगुळा केंद्रात बुधवार दिनांक २९ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १२ वाजता होणाऱ्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे तालुकाध्यक्ष शि. ल. होनगेकर असून यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार शिवाजी पाटील, माजी आमदार राजेश नरसिंगराव पाटील, माजी मंत्री भरमूअण्णा सुबराव पाटील उपस्थित राहणार आहेत.
अमृत महोत्सवी सत्कार मूर्तींमध्ये महादेव केदारी आवडन (हलकर्णी), श्रीमती सुजाता ईश्वर कुंभार (माणगाव), सौ शालिनी भीमसेन पाटील (कडलगे खुर्द), बसवंत धोंडीबा कांबळे, (देवरवाडी), कृष्णा निंगापा पाटील (सुंडी), सट्टूपा दत्तात्रय पाटील (कालकुंद्री), सौ जयश्री मारुती कुंभार (चंदगड), सुभान रोंगू शिंदे (नांदवडे), धोंडीबा काळू पाटील (नागरदळे), गावडू भरमू पाटील (किणी) यांचा समावेश असून त्यांचामान्यवरांच्या हस्ते सत्कार होणार आहे.
यावेळी गटविकास अधिकारी वृषाली यादव, गटशिक्षणाधिकारी वैभव पाटील, लेखाधिकारी सुनील बंडगर, शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव हवालदार, शिक्षण विस्ताराधिकारी सुमन सुभेदार, सुमित चंद्रमणी, नामदेव माईनकर प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
यावेळी नवनियुक्त जि. प. सदस्या विद्या विलास पाटील, रचना राहुल गावडे, मानसी कल्लाप्पा भोगण, राजश्री लक्ष्मण गावडे, पंचायत समिती सभापती विलास दत्तात्रय नाईक, उपसभापती संज्योती मळवीकर, सदस्य पांडुरंग कृष्णा बेनके, मधुकर हणमंत आंबेवाडकर, प्रेमा जगन्नाथ हुलजी, सुवर्णा चंद्रकांत कुंभार, रविंद्र नामदेव बांदिवडेकर, मनस्विनी महादेव कांबळे यांचा सत्कार होणार आहे.
या कार्यक्रमास सर्वांनी वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन संघटनेचे उपाध्यक्ष तु. रा. पाटील, वसंत जोशीलकर, जी. व्ही. दैठणकर, वसंत चांदीलकर, सुबराव गुंडप, य. सी. पाटील, शं. का. शिंदे यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment