शिवनगे येथील ताम्रपर्णी विद्यालयाच्या 1994-95 ग्रुपचा स्नेहमेळावा जंगमहट्टी येथे उत्साहात - चंदगड लाईव्ह न्युज

03 November 2019

शिवनगे येथील ताम्रपर्णी विद्यालयाच्या 1994-95 ग्रुपचा स्नेहमेळावा जंगमहट्टी येथे उत्साहात

जंगमहट्टी (ता. चंदगड) येथे शिवनगेच्या 1994-95 दहावीच्या वर्गातील विद्यार्थी-विद्यार्थ्यीनीचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला.
माणगाव / प्रतिनिधी
शिवनगे (ता. चंदगड) येथील श्री ताम्रपर्णी विद्यालयामध्ये सन १९९४- १९९५ च्या दहावीच्या वर्गातील विद्यार्थी-विद्यार्थ्यीनीचा स्नेहमेळावा पार पडला. जंगमहट्टी (ता. चंदगड) येथे दिपावलीचे औचित्य साधून, तालुक्यातील अतिशय नयनरम्य आणि निसर्ग सौंदर्याने संपन्न असलेल्या ठिकाणी झाल्या. 
या ऋणानुबंध स्नेहमेळाव्याला विविध क्षेत्रातील कार्यरत असणारे माजी विद्यार्थी आणि सासुरवाशिण विद्यार्थीनीं मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी प्रत्येकाकडुन जुन्या आठवणींना उजाळा देत शाळेतील घालवलेले सुवर्ण क्षण मनोगतातुन पुन्हा पल्लवीत झाले.  यावेळी गरजुना जमलेल्या विद्यार्थ्यां-विद्यार्थीनींच्या माध्यमातून मदत करण्याचा संकल्प करण्यात आला. यावेळी स्मृती चिन्ह देऊन सर्वांना सन्मानित करण्यात आले. सदरचा स्नेहमेळाव्याचे नियोजन करण्यासाठी श्री जोतिबा मुंगारे, मारूती मुंगारे, दिनानाथ मुंगारे, परशराम पाटील, प्रसाद पाटील, अरुण कांबळे यांनी परिश्रम घेतले. 


No comments:

Post a Comment