परतीच्या पावसाचा सुगीमध्ये अडथळा, बळीराजा चिंतेत - चंदगड लाईव्ह न्युज

03 November 2019

परतीच्या पावसाचा सुगीमध्ये अडथळा, बळीराजा चिंतेत


चंदगड / प्रतिनिधी
शहर परिसरात आज दुपारी साडेतीन वाजता सुमारे तासभर मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे भात कापमी केलेल्या शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. स
कधी ऊन तर कधी ढगाळ असे वातावरण सकाळपासून पहायला मिळाले. सकाळपासून कमालीचा उष्मा जाणवत होता. त्यामुळे पाऊस येणार हे नक्की होते. सद्या तालुक्यात सुगीची चाहूल लागली असून सर्वत्र भात पिकांच्या कापणी मळणीचा हंगाम जोरात सुरु आहे. अशा परिस्थितीच पाऊस रोजच हजेरी लावत असल्याने बळीराजा चिंतेत आहे. महापुराने शेती उध्वस्थ केली आहेत. त्यातून कशीबशी तग धरुन राहिलेली पिके आता या परतीच्या पावसाच्या तडाख्याने जमीनदोस्त होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. त्यामुळे यावर्षीची शेती संपुर्णता पाण्यात गेली आहे. महापुरात उध्वस्थ झालेल्या पिकांचे पंचनामे झाले असले तरी अद्याप शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नसल्याने आता खायचे काय हि चिंता शेतकऱ्यांसह त्यांच्या कुटुंबियांना सतावत आहे. आज दुपारी साडेतीन वाजता चंदगड शहरासह नांदवडे, नागनवाडी, शिरगाव, कोवाड, निट्टूर, हेरे परिसरात सुमारे तासभर पाऊस झाला. त्यामुळे कापलेले भातपिकांच्यामध्ये पाणी साचल्याने हातातोंडाशी आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे बळीराजा पाऊस थांबण्याची वाट पहात आहे. 

No comments:

Post a Comment