चंदगड अर्बन चषक क्रिकेट स्पर्धेत एस. के. ग्रुप संघ अजिंक्य, रोख रक्कम व चषक देवू गौरव - चंदगड लाईव्ह न्युज

12 November 2019

चंदगड अर्बन चषक क्रिकेट स्पर्धेत एस. के. ग्रुप संघ अजिंक्य, रोख रक्कम व चषक देवू गौरव

चंदगड येेथे चंदगड अर्बन बँक चषक क्रिकेट स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षिस स्विकारताना एस. के. गुपचे खेळाडू व सदस्य.
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड अर्बन बँकेच्या वतीने आयोजित केलेल्या द्वतीय वर्षाच्या मर्यादित षटकांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत एस. के. ग्रुप संघाने वेणुगोपाल संघावर विजय मिळविला. अंतिम सामन्यामध्ये रोमहर्षक खेळ करुन तीन चेंडी राखून एस. के. ग्रुप संघाने अजिंक्यपद पटकावले. र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या छत्रपती शिवाजी महाराजस्टेडीयमवर स्पर्धा पार पडली. स्पर्धेमध्ये 32 संघांनी सहभाग घेतला होता.
                                     सामन्यातील क्षण पाहण्यासाठी वरील व्हीडीओवर क्लिक करा.
चंदगड अर्बन बँकेच्या वतीने आयोजित केलेल्या या स्पर्धेला चंदगड शहरासह शेजारील गावांतूनही उत्तम प्रतिसाद मिळाला. स्पर्धेमध्ये सॅम स्पोर्ट संघाने तृतीय तर पी. की. इलेव्हन संघाने चतुर्थ क्रमांक पटकावला. स्पर्धेमध्ये मुंबई, कोल्हापूर, गोवा, बेळगावसह बांदा, निपाणी, कोनाळकट्टा, बेळगाव, बहादुरवाडीसह चंदगड येथील खेळाडू व संघानी भाग घेतला होता.
स्पर्धेतील अंतिम सामना एस. के. ग्रुप व वेणुगोपाल संघामध्ये झाला. एस. के. ग्रुपने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्विकारले. वेणुगोपाळ संघाने प्रथम फलंदाजी केली. त्यांनी दहा षटकांमध्ये सुंदर फटकेबाजी करत एस. के. ग्रुप संघासमोर सात गडी गमावून विजयासाठी 82 धावांचे आव्हान उभे केले. यामध्ये मनोजने 20, गणेशने 21, ओंकार देसाईने 15, अनंतने 15 धावा केल्या. वेणुगोपाल संघाने पहिल्या 6 षटकात 54 धावा केल्या होत्या. परंतु उर्वरीत 4 षटकात एस. के. ग्रुपने भेदक मारा केल्याने त्यांना केवळ 27 धावाच काढता आल्या.
                             सामन्यातील विजयाचा थरार पाहण्यासाठी वरील व्हीडीओवर क्लिक करा.
एस. के. ग्रुपच्या संघाने सुरवातीच्या तीन ओव्हरमध्ये 8 रन्सच्या एव्हरेजमध्ये रन्स केल्या. मात्र त्यानंतर वेणुगोपाल संघाने दर्जेदार गोलंदाजी करत फलंदाजांना रोखून धरले. त्यानंतर मात्र एस. के. ग्रुपने हळू-हळू फटकाबाजी सुरु केल्याने सामना अखेरच्या षटकापर्यंत आला. अखेरच्या षटकात 6 चेंडूमध्ये 6 धावांची गरज होती. पहिल्या तीन चेंडूमध्ये एस. के. ग्रुपच्या फलंदाजांनी त्या पूर्ण केल्या. तीसऱ्या चेंडूवर छषकार ठोकत एस. के. ग्रुपने तीन विकेटची हा सामना जिंकला. यावेळी मैदानाच्या बाजूने बसलेल्या पेक्षकांनी मैदानात धावत येऊन एस. के. ग्रुपच्या खेळाडूंना खांद्यावर उचलून घेत फटाके व नाचून आनंद व्यक्त केला. अंतिम सामना पाहण्यासाठी स्टेडीयमवर प्रेक्षकांनी तोबा गर्दी केली होती. 
 सामन्यातील बक्षिस वितरणाचा कार्यक्रम पाहण्यासाठी वरील व्हीडीओवर क्लिक करा.
मॅन ऑफ द सिरीज विशाल कल्याणकर याला देण्यात आली. उत्कृष्ट फलंदाज म्हणून अनंतला शिल्ड देण्यात आले. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून सुधीरला बक्षिस देण्यात आले तर उत्कृष्ट झेलसाठी मनोज नार्वेकर याला ट्रॉफी देण्यात आली. विजेत्यांना चंदगड अर्बन बँकेचे व पं. स. सदस्य चेअरमन दयानंद काणेकर, व्हाईस चेअरमन बाबुराव हळदणकर, जि. प. सदस्य सचिन बल्लाळ, माजी जि. प. सदस्य बाबुराव हळदणकर, माजी जि. प. सदस्य राजेंद्र परीट, संचालक संजय ढेरे, अरुण पिळणकर, सुरेश सातवणेकर, एस. आर. देशमुख, अलीसो मुल्ला, प्रवीण नाडगौडा, शिवानंद हुंबरवाडी, प्रमोद कांबळे, सॅमसन धुपदाळे, बँकेचे मॅनेजर नौशाद मुल्ला, विनायक पिळणकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते खेळाडूंना बक्षिस वितरण करण्यात आले. बारा दिवस चाललेली स्पर्धा पार पाडण्यासाठी बँकेचे कर्मचारी वर्ग, युवा स्पोर्ट्स चदंगडचे खेळाडू व ग्रामपंचायत सफाई कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. स्पर्धेसाठी खेडूत मंडळाने मैदान उपलब्ध करुन दिल्याबद्दल त्यांचेही यावेळी आभार मानण्यात आले.
                    
बारा दिवस चाललेल्या या सामन्यामध्ये काही वेळा परतीच्या पावसाने अडथळा आणल्यामुळे स्पर्धा लांबली. या स्पर्धेसाठी हिदायक नाईक व के. सी. कांबळे यांनी यांनी पंच म्हणून काम पाहिले. सामन्यांचे संपुर्ण समालोचन जमीर आगा व राजा नाईक यांनी उत्कृष्टरित्या केले.                                                                    


No comments:

Post a Comment