![]() |
दहावीच्या 2008 सालातील बँचमधील विद्यार्थ्यी पुरग्रस्तांना मदत देताना. |
कोवाड / प्रतिनिधी
कोवाड (ता. चंदगड) येथील राम मंदिर येथे दहावीच्या 2008 च्या वर्गमित्रांच्याकडून गावातील गरीब कुटुंबांना आर्थिक सहकार्य केले. गेल्या दोन महिन्यापूर्वी कोवाडमध्ये प्रचंड असा महापूर आला होता. त्यावेळी गावातील सर्व युवा वर्गाने व सर्व वर्गमित्रांनी आपापल्या परीने मदत केली होती. त्याच दृष्टीकोनातून दहावीच्या 2008 च्या वर्गमित्रांनीही पुरग्रस्थांना नुकसान झालेल्या व गावातील गरीब लोकांना मदत केली.
यावेळी बोलताना रणजित भातकांडे यांनी आपल्या बॅचच उद्दिष्ट सांगताना सचिन पाटील व गिरीश पाटील यांनी आपल्या कंपनीतील कॉलेज मधील सर्व मित्र यांचेकडून मदत मिळवली व पूरपरिस्थिती ज्यावेळी होती त्यावेळी सर्व दवाखाने व मेडिकल सुविधा बंद होती. त्यावेळी सर्वात पहिला 2008 च्या बॅच ने डॉ.नितीन भोगण व डॉ. अंजली शेट्टी यांच्या सोबत सर्व वर्गमित्र मिळून कामेवाडी, राजगोळी बुद्रुक, तलगोळी या गावांमध्ये मेडिकल कॅम्प केली. तसेच पूरपरिस्थिती ही ह्या बॅच ने लोकांना खूप मदत केली असल्याचे सांगितले इथून पुढे ही समाजकार्य करायचे असल्याचे सांगितले,श्रीकांत पाटील यांनी ग्रामपंचायत सदस्य या नात्याने 2008 च्या बॅच कौतुक केले व आभार ही मानले यावेळी रामा व्हाणयालकर,अशोक मानवडकर यांची मनोगते ही झाली.
गावातील 12 लोकांना आर्थिक निधी वाटण्यात आला. यामध्ये गंगुबाई व्हाणयालकर,सुरेश भातकांडे,जोतिबा खवणेवडकर,अनुसाय भातकांडे,गीता बुरुड,विठाबाई कांबळे,सतीश सुतार, काशीनाथ पाटील सुनीता पाटील शेवंता कुंभार लक्ष्मीबाई कुंभार व लक्षमन कुंभार याना मदत करण्यात आली. यावेळी तंटामुक्त अध्यक्ष शंकर अण्णा पाटील,मारुती भोगण जोतिबा आडवं तसेच सचिन पाटील,नितीन भोगण,सतीश आडवं,विष्णू बुरुड नितीन महागावकर,दिलीप कुंभार,सज्जाद मुल्ला,सतीश सुतार हे वर्गमित्र उपस्थित होते आभार गणेश कुंभार यांनी मांडले.
No comments:
Post a Comment