महागाव येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदीनानिमित्य अभिवादन - चंदगड लाईव्ह न्युज

18 November 2019

महागाव येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदीनानिमित्य अभिवादन

महागाव (ता. गडहिंग्लज) येथे शिवसेना प्रमुख कै. बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करताना अखलाक मुजावर, अशोक शिंदे, सुरेश हेबाळे, राजू पोटे, किरण कांबळे, नाना घुगरे आदी.
महागाव / प्रतिनिधी
महागांव (ता. गडहिंग्लज) येथे जय महाराष्ट्र मंडळ मार्फत आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सातव्या स्मृतिदीनानिमित्य अभिवादन करण्यात आले. अखलाक मुजावर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना गडिंग्लज शहर प्रमुख अशोक शिंदे उपस्थित होते.  स्वागत फिरोज सोलापुरे ग्रामपं सदस्य सदस्य महागाव यांनी तर प्रास्ताविक नरसिंग गुरव नरसिंह गुरव (उंबरवाडी)  यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते शिवसेनाप्रमुखांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केल्यानंतर आखलाक  मुजावर यांनी आपल्या भाषणातुन शिवसेनाप्रमुखांच्या आठवणींना उजाळा दिला. सुरेश हेब्बाले (विभाग प्रमुख नुल), राजु पोटे(उद्योजक महागांव), मनिष हावल (माजी शहरप्रमुख गडहिंग्लज) आदींनी मनोगते व्यक्त केली किरण कांबले (उद्योजक महागांव), नाना घुगरे(भाजप नेते), विजय दिवटे, बबन खवरे, संतोष चौगुले, अभिषेक शेरेगार, आमन मुजावर, अनिकेत हुले आदींसह शिवसैनिक व मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रामजी घेवडे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment