![]() |
न्हावेली (ता. चंदगड) येथे तरुणांच्या पुढाकाराने श्रमदानातून ओढ्यावरील बंधाऱ्यातील गाळ काढून बंधारा गाळमुक्त करताना दिपक गावडे व तरुण सहकारी. |
महापुरामुळे चंदगड तालुक्यातील सर्वच बंधारे नादुरुस्त झाले आहेत. त्याला न्हावेली (ता. चंदगड) येथील पाटाकडील शेतात असलेला ओढ्यावरील बंधाराही अपवाद नाही. महापुरामुळे डोंगरातून आलेल्या पाण्यासोबत मोठ्या प्रमाणात गाळ आला होता. हा काळ या बंधाऱ्यामध्ये अडकून पडल्याने बंधाऱ्यावरुन पाणी जात होते. त्यामुळे जनावरांना पाणी देणे, कपडे धुण्यासाठी अडचणी येत हाेत्या. याबाबत गावातील हौशी तरुणांनी पुढाकार घेवून श्रमदानातून एकत्र येवून बंधाऱ्यामध्ये अडकलेला गाळ जेसीबीच्या सहाय्याने काढला. त्यामुळे बंधारा गाळमुक्त झाला. युवकांच्या या लोकोपयोगी कामामुळे गावकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.
No comments:
Post a Comment