चंदगड येथील एका कर्मचाऱ्याचा क्रेशर खणित बुडून दुदैवी मृत्यू - चंदगड लाईव्ह न्युज

17 November 2019

चंदगड येथील एका कर्मचाऱ्याचा क्रेशर खणित बुडून दुदैवी मृत्यू

रामचंद्र बालाजी तेलंगी
चंदगड / प्रतिनिधी
पहाटे पोहण्यासाठी पप्पु नाईकवाडे यांच्या क्रेशर खणित गेलेल्या रामचंद्र बालाजी तेलंगी (वय-32, मुळ गाव वंजरवाडा, ता. जळकुट, जि. लातुर, सध्या रा. चंदगड) यांचा या खणितील पाण्यात बुडून दुदैवी मृत्यू झाला. आज सकाळी साडेसहा ते पावणेनऊच्या दरम्यान हि घटना घडली. चंदगड तहसिल कार्यालयातील वरिष्ठ लिपीक विलास पाटील (चंदगड) यांनी याबाबतची वर्दी चंदगड पोलिसात दिली. 
यासंदर्भात पोलिसातून मिळालेली माहीती अशी – रामचंद्र तेलंगी हे 2012 पासून चंदगड येथील तहसिल कार्यालयात शिपाई पदावर काम करत होते. आज सकाळी ते पोहण्यासाठी चंदगड पासून काही अंतरावर असलेल्या क्रेशर खणित पहाटे गेले होते. यावेळी त्यांनी पाण्यात उडी मारली. त्यानंतर ते पाण्यातून बाहेर आले नाहीत. त्यामुळे एकनाथ म्हाडगुत यांना बोलावून घेतले. यावेळी त्यांनी पाण्यात शोध घेतला असता त्यांना रामचंद्र तेलंगी यांचा बुडून मृत्यू झाल्याने त्यांनी त्यांचा मृतदेह पाण्यातून पावणेनऊ वाजता बाहेर काढला. मृतदेहाचे चंदगड येथील ग्रामीण रुग्णांलयात शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. घटनेची नोंद चंदगड पोलिसात झाली असून पो. हे. का. श्री. पोवार तपास करत आहेत. 
                                                    महिनाभरातील दुसरी घटना
चंदगड दि न्यु इंग्लिश स्कुलमधील प्रथमेश जाधव हा नववीमध्ये शिकणारा विद्यार्थ्यी महिनाभरापूर्वी मित्रांच्यासोबत पोहायला गेला असताना त्याचाही या खणितील पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. महिनाभरातील हि दुसरी घटना असल्यामुळे अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्याकरीता खणितील पाण्यात पोहण्यापासून रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आज प्राकर्षाने जाणवत आहे.  

No comments:

Post a Comment