चंद्रशेखर गायकवाड व कोमल हुद्दार शिवसंदेश काव्य पुरस्कार विजेते - चंदगड लाईव्ह न्युज

17 November 2019

चंद्रशेखर गायकवाड व कोमल हुद्दार शिवसंदेश काव्य पुरस्कार विजेते

काव्य पुरस्कार विजेते चंद्रशेखर गायकवाड व कोमल हुद्दार यांच्यासोबत प्रमुख पाहुणे..
मजरे कार्वे / प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद बेळगाव शाखेच्या वतीने शनिवार दिनांक 16 नोव्हेंबर रोजी वाङमय चर्चा मंडळ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय काव्य संमेलनांमध्ये शिवसंदेश काव्य पुरस्कार पुरुष गटातून चंद्रशेखर गायकवाड  तर महिला गटातून कोमल हुद्दार यांना मिळाला आहे.
या कवी संमेलनांमध्ये बेळगाव, खानापूर, चिकोडी, निपाणी, चंदगड तालुक्यातून 60 हुन अधिक कवींनी सहभाग दर्शविला होता. यामध्ये ज्येष्ठ कवींना वगळून नवोदितांना शिवसंदेश काव्य पुरस्कार देण्यात येणार होता. कवितेचा आशय, शब्द सौंदर्य, सादरीकरण याचा विचार करून पुरुष गटातून एक व महिला गटातून एक अशा दोघांची निवड काव्य पुरस्कारासाठी करण्यात आली. यामध्ये पुरुष गटातून चंद्रशेखर गायकवाड तर महिला गटातून कोमल हुद्दार यांना विजयी घोषित करण्यात आले. मुख्य परीक्षक म्हणून मोहन अष्टेकर, दशरथ यादव, शरद गोरे यांनी काम पाहिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दशरथ यादव यांनी केले रणजीत चौगुले कोणत्या आधारावर कवींची निवड करण्यात आली हे स्पष्ट करून सांगितले स्वप्नील जोगांणी यांनी आभार मानले यावेळी परीक्षकांच्या व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सूर्या ग्लास यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष अॅड.सुधीर चव्हाण, राज्याध्यक्ष रवींद्र पाटील , डी.बी. पाटील ,संजय गुरव, संजय गौडाडकर, मोहन पाटील, एल. पी. पाटील, संजय मोरे, संदीप तरळे, अरूणा गोजे- पाटील ,स्मिता चिंचणीकर, स्मिता किल्लेकर ,मनिषा नाडगौडा ,गिता घाडी , रोशणी हुंद्रे , मोहिणी कुलकर्णी व इतर कार्यकारणी सदस्य उपस्थित होते.

No comments:

Post a Comment