![]() |
कै. र. भा. माडखोलकर |
येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयात कै. र. भा. माडखोलकर यांच्या जयंतीनिमित्त आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे. रविवार 1 डिसेंबर 2019 रोजी सकाळी दहा वाजता होणाऱ्या या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी महाविद्यालांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे असे आवाहन प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील यांनी केले आहे.
स्पर्धेसासाठी कर्मयोगी सत्यशोधक शिक्षणमहर्षी र. भा. माडखोलकर सर, महापुराने काय नेले काय दिले, खुर्चींच्या खेळात जनतेचा बळी, नवे शैक्षणिक धोरण: किती तारक किती मारक, धर्मासाठी माणूस की माणसासाठी धर्म, शेतकरी मुलगा: लग्नाची समस्या असे विषय आहेत. यासाठी अनुक्रमे 4001, 3001, 2001, 1001 व प्रमाणपत्र अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. संयोजन समिती प्रमुख प्रा. एल. एन. गायकवाड यांनी महाविद्यालयांनी आपला सहभाग सत्वर नोंदविण्याचे आवाहन केले आहे. अधिक माहीतीसाठी प्रा. एम. एस. दिवटे यांच्याशी 9421102190 संपर्क करावा.
No comments:
Post a Comment