कुदनूर नदीपात्रात मगरीचे दर्शन, शेतकऱ्यांमध्ये घबराट - चंदगड लाईव्ह न्युज

20 November 2019

कुदनूर नदीपात्रात मगरीचे दर्शन, शेतकऱ्यांमध्ये घबराट

कुदनूर (ता. चंदगड) येथील ताम्रपर्णी नदीकाठावर निवांतपणे विसावलेली मगर.
तेऊरवाडी / प्रतिनिधी
कुदनुर (ता. चंदगड) येथील चिंचणे-कुदनूर दरम्यानच्या ताम्रपर्णी नदिपात्राच्या काठावर भल्या मोठ्या मगरीचे दर्शन झाल्याने नागरीकांच्यातून एकच खळबळ उडाली आहे. जीवीताच्या भितीने या परिसरात जाणे लोकांनी सोडून दिले आहे. वनविभागाने या घटनेबाबत नागरीकांना मार्गदर्शन करुन मगरीचा बंदोबस्त करण्याची मागणी आहे. 
आज दुपारी चिंचणे ते कुदनूर दरम्यान असलेल्या ताम्रपर्णीच्या नदीकाठावर जवळपास आठ ते दहा फूट लांबीची ही मगर उन्हामध्ये शांत पडून होती. यावेळी नदीच्या पालिकडील चिंचणेच्या काही ग्रामस्थाना व युवकाना या मगरीचे दर्शन झाले. ही मगर नेमकी चंदगड तालुक्यातील धरण क्षेत्रातून या ठिकाणी आली की खाली कर्नाटकात असणाऱ्या गोकाक धरणातून या ठिकाणी आली याचा नेमका अंदाज बांधणे कठीण झाले आहे. मगरीला पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती. मात्र मगरीपासून होणाऱ्या धोकाची कल्पना आल्यानंतर लोक या परिसरात जाण्याला घाबरत आहेत. ऐन सुगीच्या दिवसात या मगरीने दर्शन झाल्याने नदीकाठावर काम करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने या मगरीचा तात्काळ शोध घेऊन बंदोबस्त करावा अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment