पुराने उत्पादन घडल्याने कारखानदारांच्या स्पर्धेत ऊसाला दर मिळेल - माजी खासदार राजू शेट्टी - चंदगड लाईव्ह न्युज

21 November 2019

पुराने उत्पादन घडल्याने कारखानदारांच्या स्पर्धेत ऊसाला दर मिळेल - माजी खासदार राजू शेट्टी

कार्वे (ता. चंदगड) येथे आयोजित सभेत बोलताना स्वाभीमानीचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी.
माणगाव / प्रतिनिधी
अठराव्या ऊस परिषदेत जो दर ठरला जाईल, तोच शेतकऱ्यांनी मान्य करावा. पुर परिस्थितीने उसाचे उत्पादन जरी घटले असले तरी कर्नाटक आणि महाराष्ट्रातील ऊस कारखानदारांच्या ऊस मिळवण्याच्या स्पर्धेत शेतकऱ्याला निश्चितच भाव जादा मिळेल. यासाठी शेतकऱ्यांनी संयम बाळगावा वेळेअभावी घाईगडबड करून कोणत्याही कारखान्याला ऊस देण्याचा प्रयत्न करू नये. ऊस परिषदेत सर्वानुमते जो दर ठरवला जाईल, तो निश्चितच शेतकऱ्यांच्या उत्पादनाला हमीभाव मिळवून देणारा असेल असे प्रकट मत स्वाभीमानीचे संस्थापक व माजी खासदार राजू शेट्टी यांनी केेले. कार्वे (ता. चंदगड) येथे  आयोजित अठराव्या ऊस परिषदेच्या निमंत्रण सभेवेळी ते बोलत होते. 
माजी खासदार श्री. शेट्टी पुढे म्हणाले, ``अतिवृष्टीमुळे उस पिकाचे अतोनात नुकसान झाले. उसाची वाढ जरी खुंटली असली तरी कारखानदारांना आपले कारखाने चालण्यासाठी ऊस मिळविण्यासाठी स्पर्धा करावी लागणार आहे गेल्या वर्षी 23 00 रुपये पर्यंत उसाचा दर देणारे कर्नाटकी कारखानदार यावेळी 270 0 रुपये दर देतो असे बोलतात. कारखाना कारखान्यांच्या स्पर्धेत शेतकऱ्यांच्या उसाला निश्चितच हमीभाव मिळेल .शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला अतिवृष्टीमुळे जरी फटका बसला असला तरी यावर्षी ऊस उत्पादन कमी झाल्यामुळे कारखानदारांना आपले कारखाने चालवताना मेटाकुटीला यावे लागणार. यातच उस मिळवण्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकातील कारखानदारांना  स्पर्धेला सामोरे जावे लागणार यातून निश्‍चित शेतकऱ्यांच्या उसाला योग्य हमीभाव मिळेल .यासाठी अठराव्या ऊस परिषदेत आपण सर्व शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे जो दर ठरवला जाईल तो मान्य करूनच ऊस तोड कामगारांना उसाच्या फडात सोडावे .सरकारने शेतकऱ्यांच्या वरती परदेशी उत्पादने भारतात आणून  शेतकऱ्यांच्या मालाचा भाव कमी केला आहे .वारंवार सरकारने शेतकऱ्यांच्या वरती अन्याय करून शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाचा मूल्य कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे या स्पर्धेत निश्चितच कारखानदारांच्या या स्पर्धेत निश्चितच शेतकऱ्याला हमी भाव मिळेल असा आत्मविश्वास मा. खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला. अठराव्या ऊस परिषदेच्या निमंत्रण प्रसंगी चंदगड तालुक्यातील पाटणे फाटा येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. सुरुवातीला शेतीमालाला हमीभाव योग्य मिळाल्यानंतरच ऊस कारखान्याला पाठवण्यासाठी सामूहिक प्रतिज्ञा घेतली.`` 
यावेळी प्रास्ताविक शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष  राजेंद्र पाटील यांनी करून सभेचा हेतू स्पष्ट केला. तालुका अध्यक्ष बाळाराम फडके. प्रा. दिपक पाटील, चंदगड पंचायत समितीचे माजी सभापती जगन्नात हूलजी, राजेंद्र गड्यांन्नावर, विश्वनाथ पाटील आदी शेतकऱ्यांनी यावेळी मनोगत व्यक्त केली. तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी यावेळी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment