माडवळे व हलकर्णी ते कोल्हापूरला जाणाऱ्या गाड्यांचे मार्ग बदलण्याची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

07 November 2019

माडवळे व हलकर्णी ते कोल्हापूरला जाणाऱ्या गाड्यांचे मार्ग बदलण्याची मागणी


मजरे कार्वे / प्रतिनिधी
माडवळे ते कोल्हापूर व हलकर्णी ते कोल्हापूर या दोन एसटी महामंडळाच्या गाड्या सकाळी सात वाजता इथून कोल्हापूरला रवाना होतात. माडवळे हुन निघणारी गाडी तुर्केवाडी फाट्यावरून ढोलगरवाडी फाटा, कोवाड, नेसरी, गडहिंग्लज मार्गे कोल्हापूरला जाते. तर हलकर्णी हून निघणारी गाडी हलकर्णी फाटा, तांबुळवाडी फाटा, माणगाव, कोवाड, नेसरी, गडहिंग्लज वरून कोल्हापूरला जाते. मात्र या दरम्यान असलेल्या पाटणे फाटा, मजरे कारवे येथील प्रवाशांना या दोन्ही गाड्यांचा म्हणावा तसा फायदा होत नाही.
पाटणे फाटा हा तालुक्याच्या मध्यवर्ती असलेला झपाट्याने विकसित होणारा भाग आहे. तिलारी पासून च्या प्रवाशांची या फाट्यावर नेहमीच वर्दळ असते. धुमडेवाडी, बसर्गे, तावरेवाडी, जंगमहट्टी, मुरकुटेवाडी, मजरे कारवे या परिसरातील प्रवाशांसाठी मध्यवर्ती असणारा हा फाटा आहे. येथे प्रवाशांची नेहमीच गर्दी असते. माडवळे होऊन निघणारी गाडी व हलकर्णी हुन निघणारी गाडी, यांचा मार्ग बदलल्यास एसटी  महामंडळाला सुद्धा त्याचा फायदा निश्चितच होणार आहे. माडवळे होऊन निघणारी गाडी ढोलगरवाडी फाटा मार्गे न वळवता सरळ तांबुळवाडी फाट्यावरून घेतल्यास व हलकर्णी हुन निघणारी गाडी ढोलगरवाडी फाटा मार्गे घेतल्यास सर्व प्रवाशांची सोय होणार आहे. पाटणे फाटा, मजरे कारवे  येथील कित्येक प्रवासी सकाळी कोल्हापूर गडहिंग्लज ला जाण्यासाठी प्रवास करत असतात. या भागात कोल्हापूरला जाण्यासाठी गाडी नसल्याने येथील प्रवाशांना नागणवाडी ला किंवा बेळगावला जावे लागत आहे. त्यामुळे या दोन्हीही गाड्यांचा फक्त मार्ग बदलल्यास सर्व प्रवाशांची सोय होणार आहेच व एसटी महामंडळाचा ही फायदा यातून होणार आहे. त्यामुळे या दोन्ही गाड्यांचा मार्ग  एसटी महामंडळाच्या प्रशासनाने बदलावा व येथील प्रवाशांची सोय करावी अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.

No comments:

Post a Comment