हलकर्णी येथे शनिवारी अथर्वच्या (दौलत) बॉयलर अग्निप्रदिपन कार्यक्रमाचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

07 November 2019

हलकर्णी येथे शनिवारी अथर्वच्या (दौलत) बॉयलर अग्निप्रदिपन कार्यक्रमाचे आयोजन


चंदगड / प्रतिनिधी
हलकर्णी (ता. चंदगड) येथील अथर्व इंटरट्रेड प्रा. लि. कोल्हापूर लिज्ड युनिट दौलत शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या सन 2019-20 गळीत हंगामाचा बॉयलर अग्नि प्रदिपन कार्यक्रम शनिवार (ता. 9) रोजी सकाळी साडेदहा वाजता होणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश चिटणीस यांनी सांगितले. अथर्वचे चेअरमन व कार्यकारी संचालक मानसिंग खोराटे व त्यांच्या पत्नी सौ. मनिषा खोराटे यांच्या हस्ते कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, कॉन्टक्टर व हितचिंतक यांच्या उपस्थितीत होईल. या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन कंपनीचे संचालक राजु देसाई यांनी केले आहे. 



No comments:

Post a Comment