![]() |
गुडवळे (ता. चंदगड) येथील ग्रामस्थांच्या वतीने चंदगड विभागाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले. |
गेले काही वर्षांपासून हत्ती, गवे, इतर जंगली प्राण्यांच्याडून शेतीचे व शेतीच्या अवजारांचे प्रचंड नुकसान केले जात आहे. शेतातील भात, ऊस, नाचना, भुईमुग आदी पीके तसेच काजू, आंबा, केळी यासारख्या यांचीही नासधुस होत आहे. बैलगाड्या मोटारसायकल, शेतीची अवजारे यांचेही नुकसान झाल्याने उपासमारीची वेळ आली आहे. जंगली प्राण्यांच्या वावरामुळे नागरीकांच्या जीवीताल धोका निर्माण झाला आहे. या जंगली प्राण्यांचा कायमस्वरुपी बंदोबस्त न केल्यास सोमवारी (ता. 11) तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा खालसा गुडवळे (ता. चंदगड) येथील ग्रामस्थांनी तहसिलदार विनोद रणवरे यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
गुडवळे गावीतल बहुसंख्य लोकांचा व्यवसाय शेती आहे. गावच्या भौगोलिक रचनेनुसार गावच्या सभोवताली छोट्या वस्त्या आहेत. हत्तींकडून पिकांबरोबरच घरांची छप्परे तसेच हत्तीनी ग्रामस्थांवर हल्ला देखील केलेला आहे. ग्रामस्थांना सायंकाळनंतर घरातून बाहेर पडणे मुश्किलीचे झाले आहे. या वस्तुस्थितीबाबत चंदगडचे परिक्षेत्र वन अधिकारी यांच्याकडे तक्रार देऊनही वन्य प्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची विनंती करुनही त्यांचे त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी मुख्य वन अधिकारी व वरिष्ठ वन अधिकारी यांना अर्ज देवून वन्य प्राण्यांचा वेळीच बंदोबस्त करावा. नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन छेडणेबाबत कळविले होते. याबाबत वरिष्ठ वन अधिकाऱ्यांनी वन्य प्राण्यांपासून झालेल्या पिकांचे नुकसान भरपाई व वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे यापूर्वीचे आंदोलन मागे घेतले होते. पण वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर वन्य प्राण्यांचा कोणताही बंदोबस्त न केल्याने प्राण्यांचा उपद्रव खुपच वाढला आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी नाईलाजास्तव 11 नोव्हेंबर 2019 रोजी चंदगड परिक्षेत्र वन कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा गुडवळे ग्रामस्थांनी तहसिलदारांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. निवेदनावर संतोष पाटील, तुकाराम धुरी, अनंत पाटील, चंद्रकांत कांबळे, उत्तम गावडे, बाबुराव कोळसुंदकर, सुरेश गावडे, लक्ष्मण फणसवडेकर, शिवदास पाटील यांच्या सह्या आहेत.
No comments:
Post a Comment