सर्वोच्च न्यायालयाकडील निकालाचा आदर करावा,एकता रॅलीमध्ये पोलिस निरिक्षकांचे आवाहन - चंदगड लाईव्ह न्युज

07 November 2019

सर्वोच्च न्यायालयाकडील निकालाचा आदर करावा,एकता रॅलीमध्ये पोलिस निरिक्षकांचे आवाहन

पोलिस ठाण्याच्या वतीने एकता रॅलीमध्ये सहभागी झालेले नागरीक.
चंदगड / प्रतिनिधी
अयोध्येतील रामजन्मभूमी व बाबरी मशीद संदर्भातील सर्वोच्च न्यायालयात असलेल्या केसचा निकाल लवकरच लागणार आहे. या पार्श्वभूमीवर देशातील सर्व हिंदू-मुस्लीम समाजातील बांधवांनी निकाल कसा ही लागो, सर्वांनी एक्य भावनेने निकाल मानुन आदर करावा. आपल्यातील सर्वधर्मसमभाव ही भावना जोपासावी कोणत्याही प्रकारे आपल्या कडून काहीही अनुसूचित घडणार नाही याची काळजी घ्यावी. पोस्टरबाजी, घोषणा, पत्रके वाटू नयेत, व्हाँटस्अँपवर आक्षेपार्ह कींवा एका बाजूने संदेश पसरवू नये. या सर्व प्रकारच्या खबरदारी बाबत आज चंदगड पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली चंदगड येथील खेडूत शिक्षण मंडळाच्या महाविद्यालय ग्राऊंडवर हिंदू-मुस्लीम बांधव तसेच शहरातील सर्व शाळा, हायस्कूलच्या विद्यार्थ्यां जमले होते. सर्वोच्च न्यायालयाने रामजन्मभूमी बाबत निकाल दिल्यानंतर आदर राखण्यासाठी यावेळी पो. नि. सातपुते यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर विविध घोषणा देत शहरातील सर्व भागातून रँली काढण्यात आली. रॅलीमध्ये सुमारे सहाशेवर मुलांचा सहभाग होता.रँलीमध्ये मोठ्या संख्येने हिंदू- मुस्लीम बांंधव सहभागी झाले होते.

No comments:

Post a Comment