चंदगड ते चंदगड फाटा रस्त्यावर खड्यांचे साम्राज्य, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष - चंदगड लाईव्ह न्युज

06 November 2019

चंदगड ते चंदगड फाटा रस्त्यावर खड्यांचे साम्राज्य, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष


चंदगड / अनिल धुपदाळे
चंदगड ते चंदगड फाटा या अडीच किलोमीटर रस्त्यावर सर्वत्र खड्डे पडल्यामुळे या रस्त्याने वाहने नव्हे तर दिवसाच्या उजेडात माणसाला चालनेही कठीण झाले आहे. वारंवार या रस्त्यावर खड्डे पडत असल्याने या मार्गावरुन प्रवास करणाऱ्यांचा याचा सर्वांधिक त्रास सहन करावा लागत आहे. 
हा रस्ता दरवर्षी पडणाऱ्या खड्यामुळे चर्चेत असतो. दुर्दैवाने याच रस्त्यावर चंदगड फाट्याजवळ सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय आहे. चंदगड ते चंदगड फाटा हा मार्ग नेहमीच वर्दळीचा आहे. त्यामुळे सध्या या ठिकाणी जागोजागी पूर्ण अडीच किलोमीटर रस्त्यावर खड्यांचे महासाम्राज्य बनले आहे. बांधकाम विभागाकडे या रस्त्याबाबत ठरलेले उत्तर आहे, की हा रस्ता रुंदीकरणासह आहे. याचे काम लवकरच सुरू होईल. गेली कीत्येक दिवस हेच उत्तर आहे. रस्ता रूंदीकरण होईल तेंव्हा होईल पण सध्या खड्डे तरी भरावेत अशी प्रवाशांची कळकळीची मागणी आहे. या ठिकाणाहून वाहन चालवताना अपघात झाल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न विचारला जात आहे. काही वाहनधारक या रस्त्यावरुन जाण्याऐवजी हिंडगाव फाट्याकडुन जादा चार कीलोमीटरच्या अंतरावरून चंदगड शहरात येत असल्याचे चित्र आहे. चंदगड-ते-चंदगड फाटा हा सध्याचा रस्ता म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग चंदगडच्या उत्तम कामाचा नमुना ठरला आहे. चंदगडच्या जनतेचा सहनशीलतेची परिक्षा या  रस्त्याबाबत बांधकाम विभाग घेत आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे. प्रवाशांना होणारा त्रास पाहता संबंधित विभागाने तातडीने हा रस्ता दुरुस्त करुन प्रवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment