शिवनगे येथील विद्यार्थ्यानी घेतली गडभेट, दुर्गवीर प्रतिष्ठानचा पुढाकार - चंदगड लाईव्ह न्युज

06 November 2019

शिवनगे येथील विद्यार्थ्यानी घेतली गडभेट, दुर्गवीर प्रतिष्ठानचा पुढाकार

दुर्गवीर प्रतिष्ठान मुंबई या संस्थेच्या वतीने शिवनगे येथील शालेय विद्यार्थ्यांना कलानंदीगडाचे दर्शन घडविले. 
दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
कलिवडे (ता. चंदगड) येथील दुर्गवीर प्रतिष्ठान मुंबई संस्थेचे चंदगड तालुका कार्यवाहक अजित पाटील यांनी शिवनगे गावच्या विद्यार्थ्यांची नुकतीच कलानंदीगड गडाचे दर्शन घडवून आणले.
महाराष्ट्राचे वैभव असलेल्या गड-किल्ल्यांचे आकर्षण सर्वानाच असते. छत्रपती शिवरायांचा आणि मराठा साम्राज्याचा प्रेरणादायी इतिहास या गडांची निगडित असल्यामुळे गड प्रत्यक्ष पाहण्याची उत्सुकता साऱ्यांनाच होती. हे लक्षात घेऊन अजित पाटील यांनी सरपंच अरुण पाटील, प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष हसुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली येथील ताम्रपर्णी विद्यालयातील विद्यार्थ्यांची ही सहल आयोजित केली. गडाची उभारणी करण्यासाठी विशिष्ट डोंगराची निवड, बांधकाम, बुरुज, तट, दरवाजे यांची रचना,पाण्याची सोय, इमारती, मंदिरे इत्यादी स्थापत्य शास्त्राबद्दल दुर्गवीर कार्यकर्ते मंदार पाटील, संतोष कलखांबकर, बाबु जाणकर आदींनी माहिती दिली. अजित पाटील यांनी प्रतिष्ठान तर्फे सदर गडासह विविध गडावर चाललेले संवर्धनाचे कार्य, इतर सामाजिक उपक्रम याविषयी सांगून गड संवर्धनाची गरज विषद केली.  यावेळी शिवाजी आवडणकर, संदीप सांबरेकर, राजू पाटील, धोंडीबा पाटील आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment