एकादशीच्या पार्श्वभूमीवर वारकरी चालताहेत पंढरीची वाट - चंदगड लाईव्ह न्युज

05 November 2019

एकादशीच्या पार्श्वभूमीवर वारकरी चालताहेत पंढरीची वाट

वारकरी पंढरपुरच्या दिशेने जाताना. 
दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यातील सर्व भागातील (शेतकरी) वारकरी पंढरपुरच्या वारीला जाण्यास सज्ज झाले आहेत.
यंदा पावसाने शेतकऱ्याच्यां  डोळ्यात अश्रू आणले असुन अजुनही पाऊस पडत असल्यामूळे हातातोंडाशी आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रामुख्याने तालुक्यातील शेतकरी भात, नाचणी, भुईमुग, नाचणा, रताळी, ऊस मिरची अशी पिके घेत असतो.
एकिकडे आस्मानी व सुल्तानी  संकटात सापडलेला शेतकरी वर्ग सर्व दु:ख विसरुन आपले गाऱ्हाणे विठुरायाकडे मांडण्यासाठी  कार्तिक वारीला जाण्यासाठी सज्ज  झाला. वारीला जाण्यासाठी पैसा  साठवण्यासाठी आकडेमोड करत असून प्रसंगी प्रधानमंत्री किसान योजनाचे पैसे खात्यावर जमा आहेत का? हे पाहण्यासाठी बँकेच्या दारात शेतकरीवर्गाने गर्दी केल्याचे पाहवयास मिळत आहे. अडकुर, नागणवाडी,  कानुर,  हेरे,  शिनोळी,  कोवाड, हलकर्णी,  माणगाव या सर्वच परीसरातून वारकरी पंढरपूरला जाण्यासाठी तयारीला लागले आहेत.


No comments:

Post a Comment