युवकांच्या स्वयंरोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना कार्यान्वित - चंदगड लाईव्ह न्युज

05 November 2019

युवकांच्या स्वयंरोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना कार्यान्वित


कोल्हापूर / प्रतिनिधी
उद्योग व्यवसाय क्षेत्रात युवक-युवतीसाठी स्वयंरोजगार व रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.  ज्यांचे वय 18 ते 45 वर्षे पर्यंत आहे अशा युवक-युवती या योजनेस पात्र आहेत, असे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतीश शेळके यांनी कळविले आहे. 
योजनेचे अर्ज maha-cmegp.gov.in या संकेतस्थळ ऑनलाईन पध्दतीने सादर करावेत. योजनेत राष्ट्रीयकृत, शेड्युल्ड व खाजगी बॅकांचा समावेश असून सेवा उद्योग घटका करीता रुपये 10 लाख मर्यादा व उत्पादन प्रक्रिया उद्योग घटका करीता रुपये 50  लाख पर्यत प्रकल्प मर्यादा आहे. योजने अंतर्गत प्रवर्ग निहाय 15 ते 35 टक्के अनुदान,मार्जीन मनी अनुज्ञेय आहे. या योजने अंतर्गत वयोमर्यादा सर्वसाधारण प्रवर्गासाठी वय 45 वर्षे व विशेष प्रवर्गासाठी (अनुसुचित जाती, अनु. जमाती, महिला, अपंग,माजी सैनिक) वयोमर्यादा 5 शिथील करण्यांत आलेली आहे. तसेच शैक्षणिक पात्रताही उत्पादन प्रकल्प मर्यादा 10 लाखावरील 7 वी पास व 25 लाखावरील प्रकल्पासाठी 10 वी पास पात्रता आहे. जिल्हा उद्योग केंद्र (DIC) व महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ ( KVIB) या यंत्रणेमार्फत राबविण्यात येणार आहे. जिल्हा उद्योग केंद्र यंत्रणेकडे -शहरी भाग, तालुक्याची मुख्यालये व ग्रामीण भाग (ज्या गावाची लोकसंख्या 20000 चे वर आहे) व महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ यंत्रणेकडे - ग्रामीण भाग (ज्या गावाची लोकसंख्या 20000 चे आत आहे) अशी अंमलबजावणी कार्यक्षेत्रे आहेत.
                                                        मानसिंग खोराटे यांचा सत्कार, यावेळी ते काय म्हणाले.

 कर्ज प्रकरणाकरिता आवश्यक कागदपत्रे (आधारकार्ड,जातीचा दाखला (एससी/एसटी करीता),शाळा सोडल्याचा दाखला/वयाचा दाखला,शैक्षणिक पात्रताचे दस्तऐवज,उद्योजकता प्रशिक्षण घेतले असल्यास तसे प्रमाणपत्र,नियोजित उद्योग/सेवा उद्योगासाठी आवश्यक असणा-या जागेचे दस्तऐवज/भाडेकरार,वचनपत्र व आवश्यकते नुसार इतर कागदपत्रे. योजनेच्या अर्जा करिता जिल्हा उद्योग केंद्र अथवा जिल्हा खादी ग्रामोद्योग मंडळ,उद्योग भवन,कोल्हापूर कार्यालयाशी संपर्क साधावा. 

No comments:

Post a Comment