चंदगड लाईव्ह न्युजला जिल्हा रिपोर्टर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांकडून सदिच्छा भेट, प्रगतीबाबत कौतुक - चंदगड लाईव्ह न्युज

04 November 2019

चंदगड लाईव्ह न्युजला जिल्हा रिपोर्टर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांकडून सदिच्छा भेट, प्रगतीबाबत कौतुक

चंदगड लाईव्ह न्युज चॅनेलच्या कार्यालयाला भेटीप्रसंगी जिल्हा अध्यक्ष सुधाकर निर्मळे, भास्कर चंदनशिवे, श्री. तराळे, श्री. पाटील यांच्यासह अध्यक्ष नंदकुमार ढेरे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल धुपदाळे, उदयकुमार देशपांडे व चॅनेलचे पदाधिकारी. 
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुका पत्रकार संघ संचलित चंदगड लाईव्ह न्युज (पोर्टल) चॅनलने वर्ष पूर्ण होण्याआधीच तब्बल साडेपाच हजार सभासदांचा टप्पा गाठला. त्या निमिताने कोल्हापूर जिल्हा रिपोर्टर असोसिएशनच्या पदाधिकारी मंडळीनी चंदगड येथे चॅनेलच्या कार्यालयाला भेट देऊन चॅनलच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीने 20 नोव्हेंबर 2018 रोजी चंदगड लाईव्ह (पोर्टल) न्युज चॅनलची सुरुवात झाली आहे. एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच चंदगड लाईव्ह न्युजने साडेपाच हजार  सभासदांचा टप्पा गाठला आहे. वर्षे पूर्ती पूर्वीच चँनलने हा टप्पा गाठताना वाचकांना, दर्शकांना केंद्रस्थानी मानून बातम्या व व्हिडीओ प्रसिद्ध करून अल्पावधीत लोकप्रियता मिळवली आहे. विशेषत: महापुराच्या काळात दिलेल्या बातम्याबाबत बाहेरगावी असलेल्या चाकरमान्यांकडून विशेष कौतुक झाले. आजच्या आधुनिक युगात जलद पध्दतीने सर्वच क्षेत्रात कार्यरत राहणे आवश्यक आहे. हे ओळखुन त्यानुसार चॅनलने आपल्याकडून सर्व प्रकारच्या घडामोडींचा वेध घेवुन घडामोडी वाचक, दर्शकापर्यंत पोहचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. याबद्दल कोल्हापूर जिल्हा रिपोर्टर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना चॅनलच्या संचालक मंडळाने ही माहिती दिली. चॅनलने अल्पावधीतच नावलौकीक मिळवल्याबध्दल जिल्हा अध्यक्ष सुधाकर निर्मळे, भास्कर चंदनशिवे, श्री. तराळे, श्री. पाटील आदींनी कौतुक केले. यावेळी बोलताना अध्यक्ष श्री. निर्मळे यांनी चॅनलची जिल्हा व राज्य पातळीपर्यंत व्याप्ती वाढविण्यासठी आम्ही कोणत्याही परिस्थितीत तुमच्या पाठीशी असल्याचे ग्वाही दिली. 
चंदगड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकुमार ढेरे यांनी स्वागत केले. यावेळी उदयकुमार देशपांडे, अनिल धुपदाळे, श्रीकांत पाटील यांच्या हस्ते पाहुण्यांचे पुष्प देवुन स्वागत केले. यावेळी संपत पाटील, चेतन शेरेगार, संजय पाटील यांच्यासह सदस्य उपस्थित होते. संपर्क प्रमुख संतोष सुतार यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment