![]() |
तेऊरवाडी ( ता. चंदगड ) येथील रामू पाटील व भरमू पाटील यांच्या शेतातील नाचना गव्यानी खाऊन केलेेले नुकसान. |
कोवाडपासून जवळच असणाऱ्या तेऊरवाडी (ता. चंदगड) येथे अवकाळी परतीच्या पावसाने कापणीला व काढणीला आलेल्या सगळ्या पीकाना बसला आहे. यामध्ये काही पिके पावसाच्या तडाख्याने वाचली असली तरी ती आता गव्यांच्या तुडवण्याने व खाण्याने उध्वस्थ झाली आहेत. त्यामुळे पावसाने झोडपल्याने व गव्यांनी तुडवल्याने या परिसरातील शेतकरी हतबल झाला आहे. वनविभागाने या गव्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची शेतकरी वर्गाने केली आहे.
तेऊरवाडीचा उत्तर बाजूला कर्नाटक व महाराष्ट्र सिमेवर प्रचंड मोठा जंगल आहे. जंगलामध्ये प्रंचंड प्रमाणात गवी रेडयांचा वावर चालू आहे. दिवसभर जंगलात वावरणारे गवी रात्र होताच जंगल पायथ्याला असणाऱ्या तेरऊरवाडी, दुंडगे, चिंचणे व गडहिंग्लज तालुक्यातील हडलगेच्या शेतीकडे आपला मोर्चा वळवत आहेत. सध्या या परिसरातील भात, मका, भूईमूग, नाचना आदि पिकेे पावसाच्या तडाख्याने उद्धस्थ झाली आहेत. थोड्याफार वाचलेल्या पिकांना शेतकरी घरी आणण्याचा प्रयत्न करत आहे. पण या पीकावर गव्यांची नजर पडली असल्याने त्यांच्याकडून ही पीके उध्वस्थ केली जात आहेत. येथील भरमू पाटील, विजय पाटील, केदारी पाटील, रामू पाटील, नामदेव पाटील आदि शेतकऱ्यांच्या शेतातील भात, नाचना पिकाची प्रचंड नासधूस करण्यात आली. वर्षभर काबाडकष्ट करून कापणी व काढणीला आलेली पिके गवे उध्वस्थ करत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. वन विभागाने या गव्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा तेऊरवाडी ग्रामस्थांनी दिला आहे.
No comments:
Post a Comment