चंदगड / प्रतिनिधी
चंदगड पंचायत समितीस्तरावर ग्रामसेवक, सरपंच व विविध विभागातील अधिकारी यांची तत्काळ संयुक्त बैठक गटविकास अधिकाऱ्यांनी घ्यावी अशी मागणी अॅड. संतोष मळवीकर, एकनाथ कांबळे, स्वप्नाली गवस, सोनाली गावडे, निर्मला गवस, पंकज तेलंग, संज्योती मळवीकर यांनी केली आहे.
गेल्या वर्षभरात अनेक समस्यांना सरपंचांना तोंड द्यावे लागत आहे. बांधकाम विभागामार्फत एस्टीमेंट व एम. बी. वेळेत मिळत नाहीत. कृषि विभागाकडून योग्य माहिती मिळत नाही. ग्रामपंचायत विभागाकडून कधीच ग्रामपंचायतीची तपासणी होत नाही. ग्रामसेवक वेळेवर हजर राहत नाहीत. ऑपरेटरांच्या पगाराबद्दल अडचणी वाढल्या आहेत. अनेक सरपंचांचे मानधन मिळालेले नाही. अशा समस्या सरपंचांना भेडसावत आहेत. यावर चर्चा करून योग्य रितीने सोडवण्यासाठी प्रशासन व सरपंच यांची बैठक घडवून आणणे महत्वाचे आहे. त्यामुळे सरपंच, ग्रामसेवक, अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्याची सरपंच संघटनेने गटविकास अधिकारी आर. बी. जोशी यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
No comments:
Post a Comment