हलकर्णी येथे ३ते ५ डिसेबरला तालूकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

25 November 2019

हलकर्णी येथे ३ते ५ डिसेबरला तालूकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन


चंदगड / प्रतिनिधी
हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात जिल्हा परिषद  व पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ४५ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन ३ ते ५ डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचा विषय "शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान" हा आहे. 
विज्ञान दिंडीचे उद्घाटन मंगळवार  ३ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता दौलत विश्वस्त संस्था हलकर्णीचे सचिव विशाल पाटील आणि सरपंच एकनाथ कांबळे यांच्या हस्ते होणार आहे . विज्ञान प्रदर्शन दौलत विश्वस्त संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक गोपाळराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली चंदगडचे आमदार राजेश पाटील , सभापती बबनराव देसाई , उपसभापती विठाबाई मुरकुटे यांचे हस्ते उद्घाटन होणार आहे . चंदगडचे तहसीलदार विनोद रणवरे यांच्या हस्ते उपकरणे उद्घाटन , शैक्षणिक साहित्य उद्घाटन गटविका अधिकारी रमेश जोशी , विज्ञान दालनाचे उद्घाटन दौलतचे अध्यक्ष अशोकराव जाधव , गोकुळचे संचालक दीपक पाटील , दौलतचे उपाध्यक्ष संजय पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
बुधवार दि . ४ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता प्रश्न मंजुषा स्पर्धा उद्घाटन समारंभ प्राचार्य डॉ . पी . वाय . निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे . चंदगड पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी सौ . एस . एस . सुभेदार यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे . शुक्रवार - दि . ५ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता पारितोषिक वितरण होणार आहे . अध्यक्षस्थानी दौलतचे अध्यक्ष अशोकराव जाधव असून चंदगडचे पोलीस निरीक्षक अशोक सातपुते दौलतचे उपाध्यक्ष संजय पाटील , प्रमुख पाहुणे म्हणून लाभणार आहेत . तरी सर्व बी . आर . सी . स्टाफ , प्राथमिक ,माध्यमिक ,उच्च माध्यमिक शिक्षक संघटना , सर्व मुख्याध्यापक , शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी उपस्थित रहावे , असे आवाहन प्राचार्य डॉ . पी . वाय . निंबाळकर , गटशिक्षणाधिकारी सौ . सुमन सुभेदार , तालुका विज्ञान प्रदर्शन प्रमुख यशवंत चौधरी यांनी केले आहे .

No comments:

Post a Comment