दुंडगे (ता. चंदगड) येथील सरपंच राजू पाटील यांनी सरपंच मानधनातून गावातील शालेय विद्यार्थ्यांना किल्ले दर्शन सहल घडवून आणली. ४० मुलाना पारगडावर घेऊन जाऊन इतिहासाची माहिती दिली. छोट्या मुलांच्यासमोर इतिहासातील अनेक आठवणी उभ्या केल्या. गडाची रचना, भावानी मातेचे मंदिर, तटबंदी व तोफा पाहून मुलं भारावून गेली. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत मुलानी दिवसभर गडाची महिती जाणून घेतली . सरपंच पाटील यांच्या या निर्णयाने दिपावलीच्या सुट्टीत मुलाना वेगळी अनुभूती मिळाल्याने पालकांच्यातून समाधान व्यक्त होत आहे.
|
किल्ले पारगड दर्शनाचा फलक उंचावून दाखवताना मुले. |
सध्या शहरी भागासह ग्रामीण भागातही मोबाईल व इंटरनेटचे वारे वाहू लागले आहे. मोबाईलच्या गरजेचे रुपांतर व्यसनात होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. लहानमुलानाही त्याची सवय लागून ती मोबाईलमध्ये गुंतून आहेत. पारंपारीक खेळाना फाटा देऊन मुलं मोबाईल मधील गेम खेळण्यात गुतली आहेत. त्याचा त्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असल्याने पालक चिंतेत आहेत. त्याअनुषंगाने सरपंच पाटील यांनी मोबाईलच्या चक्रातून मुलाना बाहेर काढून प्रत्यक्ष कृतीतून संदेश देण्यासाठी सहलीचे आयोजन केले. महाराष्ट्र शासनाने सरपंचांच्या मानधनात वाढ केल्यानंतर पहिल्या तीन महिन्याचे वाढीव आलेले मानधन मुलांच्यासाठी खर्च करण्याचा सरंपच पाटील यांनी निर्णय घेतला. दोन दिवसापूर्वी त्यानी पारगडावर सहल काढली . सहलीत ४० मुल सहभागी झाली होती. सरवातीला मुलानी गडावरील स्वच्छतेचे काम केले. त्यानंतर सरपंच पाटील यांनी पारगडाची ऐतिहासीक महिती दिली. गडावरील तलाव, विहीरी, तटबंदी व स्मारके पाहून मुलं थक्क झाली. गडावरील महत्वाच्या गोष्टींच्या मुलानी नोंदी करून घेतल्या. तसेच त्या ठिकाणी वास्तव्याला असलेल्या लोकांशी त्यानी गप्पा मारुन गडाचा इतिहास समजून घेतला. त्यानंतर दुपारी गडावर सामूहीक भोजनाचा आस्वाद घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत मुलानी कबड्डी, लपाछपी, दोरी उड्या असे खेळ खेळून सहलीचा आनंद लुटला .
No comments:
Post a Comment