संगम आकाश धरणीचा या गिताचे गितकार योगेश देसाई |
चंदगड तालूक्यातील बागीलगे येथील युवक योगेश सुरेश देसाई याने लिहीलेल्या संगम आकाश धरणीचा या गिताचा टिसिरीज यू ट्यूब चॅनेलवर धूमाकूळ चालू आहे. चंदगड तालूक्यातील एका ग्रामिण भागातील युवकाला बेळगावच्या युवकानी जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचवल्याने सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
योगेशने संगम आकाश धरणीचा हे खूपच छान गीत लिहीले आहे. या गीताला बेळगावच्या अनुप पवार यानी संगीत दिले आहे तर केवल वाळंज यानी आपल्या सुरेल आवाजात हे गीत गायिले आहे. म्यूजिक अॅरेंज अजिंक्य कुडतरकर यानी केले असून गीताचे प्रोड्यूसर विनय पाटील यानी केले आहे. या गिताचे चित्रीकरण गडहिंग्लज तालूक्यातील सामनगड परिसरात केले आहे. तर यामध्ये मनोज तानवडे, वैष्णवी भुते, दिनेश बेकवाडकर, आश्विनी कोचेरी, संदिप बामरे, रेणुका कदम, योगेश कदम, स्मिता लाड, आकाश शापुरकर या कलाकारांनी नृत्य केले आहे. चंदगड च्या युवकाला बेळगावच्या हरहून्नरी नवोदित कलाकारांची मोलाची साथ लाभली. या गीताची नामांकित अशा टि-सिरीज चॅनेलला निवड झाल्याने चंदगड चे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचले आहे.
1 comment:
Congratulations Yogesh
Post a Comment