अडकुर शिवशक्ती हायस्कूल येथे बिटस्तरीय मूल्यवर्धन प्रशिक्षणाचा प्रारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

18 November 2019

अडकुर शिवशक्ती हायस्कूल येथे बिटस्तरीय मूल्यवर्धन प्रशिक्षणाचा प्रारंभ

अडकूर येथे मूल्यवर्धन प्रशिक्षणाला उपस्थित केंद्रप्रमूख श्री जगताप, प्राचार्य एस. जी. पाटील व महादेव नाईक.
अडकूर / प्रतिनिधी
शिवशक्ती हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज  अडकुर ( ता. चंदगड ) येथे बिटस्तरीय मूल्यवर्धन प्रशिक्षणाची सुरुवात आज सोमवार १८ नोव्हेंबर पासून झाली. प्रशिक्षण केंद्राचे समन्वयक केंद्रप्रमुख जी. बी. जगताप  यांनी सर्वांचे स्वागत केले. प्राचार्य एस. जी. पाटील यानी विद्यार्थी सर्वगुणसंपन्न बनविण्यासाठी प्रशिक्षणे महत्वाची असून ती सर्वानी घेण्याचे आवाहन केले. मार्गदर्शक तुकाराम कदम यांनी प्रशिक्षणाची पार्श्वभूमी, मुल्यवर्धन प्रशिक्षणाची उद्दीष्टे सविस्तर सांगितली. कार्यशाळेची रूपरेषा, मूल्यवर्धनाची सद्यस्थिती यावर केंद्रप्रमुख जगताप यांनी चर्चा घडवून आणली. तुकाराम कदम यांनी कृतीयुक्त गाण्यातून सहज सोप्या पद्धतीने प्रशिक्षणात मनोरंजन घडवून आणले. थींक-पेअर-शेअर या मुलतत्वाची ओळख बाळु सुर्यवंशी यांनी करून दिली. प्रोजेक्टर व पी. पी. टी. च्या माध्यमातून मूल्यवर्धक व्हिडिओ क्लिप दाखवल्या.  प्रशिक्षणाला केंद्रप्रमुख श्री. निट्टूरकर, तालुका समन्वयक रविंद्र पाटील यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले. या प्रशिक्षण वर्गाचे आभार साधनव्यक्ती महादेव नाईक यांनी मानले.

No comments:

Post a Comment