रवळनाथ हौसिंगमार्फत बेळगाव येथे सभासदांना मार्गदर्शन
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव / प्रतिनिधी
सभासद व संस्था यांच्यातील ऋणानुबंध सातत्याने वाढत गेले तरच संस्थेची भरभराट होते. ,कारण प्रत्येक संस्थेमध्ये सभासद हा महत्वाचा गाभा असतो , संस्थेच्या प्रगतीत सभासदांचे मोल महत्वाचे आहे, असे प्रतिपादन केएलएस गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्स (बेळगाव)चे माजी प्राचार्य डॉ . अनिल कालकुंद्रीकर यांनी केले . रवळनाथ हाऊसिंग फायनान्स सोसायटी, आजरा या संस्थेच्या टिळकवाडी येथील शाखेतर्फे आयोजित केलेल्या सभासद मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थापक एम.एल.चौगले होते. न्यू उदय भवन सभागृहात सदर मेळावा झाला . डॉ.कालकुंद्रीकर यांनी यावेळी बहुराज्य सोसायटी कायदा - २००२ या अंतर्गत सभासद आणि त्यांच्या जबाबदाऱ्या यावरही मार्गदर्शन केले.
डॉ. जे. जी. नाईक म्हणाले, ``प्रत्येक सभासदाने किती कर्ज घेतले, ते परतफेड होते की नाही, याची चौकशी संस्थेशी संबंधित घटकानी करावी,संस्थेच्या हितासाठी हि चौकशी फायदेशीर आहे. संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले म्हणाले, सीमाभागाचे हित लक्षात घेऊन आमच्या शाखेतर्फे सेवा देत आहोत. आमचा प्रत्येक निर्णय सभाासदांच्या हिताचा आहे. यावेळी चिदंबर मुनवळळी, प्रा. डॉ. कृपा देशपांडे उपस्थित होत्या. रवळनाथ सोसायटीच्या कामगिरीची दखल घेऊन अखिल भारतीय सहकारी संघ , नवी दिल्ली यांच्याकडून महाराष्ट्रातील रवळनाथ हौसिंग सोसायटी या एकमेव संस्थेला आहे. सभासद मेळाव्यासाठी निधी मंजूर झाला असून पहिला मेळावा बेळगाव येथे झाला. प्रा. डॉ. संदीप देशपांडे यांनी सुत्रसंचालन केले. शाखा व्यवस्थापक दीपक कोले यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment