स्वाभिमानीच्या वतीने बुधवारी कार्वेत शेतकरी मेळाव्याचे आयोजन, राजू शेट्टी यांची उपस्थिती - चंदगड लाईव्ह न्युज

19 November 2019

स्वाभिमानीच्या वतीने बुधवारी कार्वेत शेतकरी मेळाव्याचे आयोजन, राजू शेट्टी यांची उपस्थिती

राजु शेट्टी
चंदगड / प्रतिनिधी
जयसिंगपूर येथील ऊस परिषदेच्या पूर्वतयारीसाठी मजरे कार्वे (ता. चंदगड)  येथील मेडिकल असोसिएशनच्या हॉलमध्ये बुधवार २० नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी अकरा वाजता माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत चंदगड तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित केला आहे. शेतकऱ्यांच्या ऊसाला सर्वाधिक ऊस दर मिळावा, यासाठी दरवर्षी जयसिंगपूर येथे स्वाभिमानी मार्फत  ऊस परिषदेचे आयोजन केले जाते. त्यानंतर उसाचा दर निश्चित होतो. या ऊस परिषदेला चंदगड तालुक्यातून मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी उपस्थित रहावेत, यासाठी कार्वेत मेळाव्याचे आयोजन केले आहे. सर्वांनी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष  बाळाराम फडके यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment