लक्ष्मण गणपती कोकीतकर |
कुदनुर (ता. चंदगड) येथील लक्ष्मण गणपती कोकीतकर (वय -29) या युवकाचा रेल्वे डब्यातून पडून काल मृत्यू झाला. बेळगाव नजिक असलेल्या अकंली-पाच्छापूर गावा दरम्यान हि घटना घडली. लक्ष्मण हा पुण्यात एका कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये कामाला होता. काही दिवसापूर्वी सुट्टीवर आलेला लक्ष्मण काल बेळगावहून पुण्याला रेल्वेने जात होता. दरम्यान पाच्छापूर- अंकलीनजीक लक्ष्मणचा रेल्वेडब्यातून पडून अपघात झाला. यामध्ये लक्ष्मण गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. बेळगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
No comments:
Post a Comment