चंदगड / प्रतिनिधी
चंदगड नगरपंचायतीसाठी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्षपदासाठी 10 तर आतापर्यंत 16 अर्ज आले आहेत. तर नगरसेवक पदाच्या सतरा जांगासाठी आज विक्रमी 66 तर आतापर्यंत एकूण 92 व्यक्तींचे 153 अर्ज दाखल झाले आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी व काँगेसची राज्याप्रमाणे चंदगड नगरपंचायतीमध्ये श्री देव रवळनाथ चंदगड महाविकास आघाडी केली आहे. उद्या शुक्रवार दि.13 रोजी चंदगड येथील तहसिल कार्यालयातील सभागृहात सकाळी 10 वाजता छाननी होणार आहे. त्यामुळे भाजप, महाविकास आघाडी, मराठा समजा व राष्ट्रीय समाज पक्ष यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे.
आज दिवसभरात नगराध्यक्षपदासाठी समृध्दी सुनिल काणेकर, पुनम विजय कडुकर, हसीना शहाबुद्दीन नाईकवाडी, संध्या रामचंद्र पेडणेकर, परवीन नौशाद मुल्ला, संजीवनी संजय चंदगडकर, शुभांगी उदय चौगुले यांनी दोन अर्ज, मनिषा महादेव आमणगी, सुजाता सुरेश सातवणकेर यांचे दहा अर्ज आले आहेत. तर आतापर्यंत नगराध्यक्षपदासाठी 13 व्यक्तींनी 16 अर्ज दाखल केले आहेत.
प्रभागनिहाय दाखल झालेले एकूण अर्ज – प्रभाग क्रमांक एकमध्ये 6 उमेदवार 9 अर्ज, प्रभाग क्रमांक दोनमध्ये 14 उमेदवार 23 अर्ज, प्रभाग क्रमांक तीनमध्ये 4 उमेदवार 5 अर्ज, प्रभाग क्रमांक चारमध्ये 2 उमेदवार 4 अर्ज, प्रभाग क्रमांक पाचमध्ये 9 उमेदवार 17 अर्ज, प्रभाग क्रमांक सहामध्ये 7 उमेदवार 11 अर्ज, प्रभाग क्रमांक सातमध्ये 3 उमेदवार 5 अर्ज, प्रभाग क्रमांक आठमध्ये 5 उमेदवार 7 अर्ज, प्रभाग क्रमांक नऊमध्ये 5 उमेदवार 10 अर्ज, प्रभाग क्रमांक दहामध्ये 3 उमेदवार 5 अर्ज, प्रभाग क्रमांक अकरामध्ये 3 उमेदवार 5 अर्ज, प्रभाग क्रमांक बारामध्ये 4 उमेदवार 10 अर्ज, प्रभाग क्रमांक तेरामध्ये 6 उमेदवार 9 अर्ज, प्रभाग क्रमांक चौदामध्ये 8 उमेदवार 12 अर्ज, प्रभाग क्रमांक पंधरामध्ये 6 उमेदवार 10 अर्ज, प्रभाग क्रमांक सोळामध्ये 3 उमेदवार 5 अर्ज, प्रभाग क्रमांक सतरामध्ये 4 उमेदवार 6 अर्ज, असे एकूण 92 व्यक्तींनी 153 विक्रमी अर्ज दाखल केले आहेत.
आज शेवटच्या दिवशी दिवसभरात नगरसेवक पदासाठी दाखल झालेले अर्ज वार्डनिहाय
प्रभाग क्रमांक एकमधून विक्रम शांताराम गुरबे एक अर्ज.
प्रभाग क्रमांक दोनमधून विक्रम कल्लापा मुतकेकर व जहागीर महम्मद पटेल यांनी प्रत्येकी दोन तर चंद्रकांत पुरुषोत्तम दाणी, सचिन राजाराम बुरुड, प्रकाश सत्तुराम पाटील, विशाल सदानंद गायकवाड यांनी प्रत्येकी एक अर्ज दाखल केला आहे.
प्रभाग क्रमांक तीनमध्ये मुमताजबी सुलेमान मदार व रेश्मा रामचंद्र बांदेकर, फिरदोस नियाज मदार यांनी प्रत्येकी एक अर्ज.
प्रभाग क्रमांक चार एकही नाही.
प्रभाग क्रमांक पाचमध्ये सल्लाऊद्दीन महम्मदगौस नाईकवाडी यांनी दोन तर सुहेल शहाबुद्दीन नाईक, दिलावर दस्तगीर सय्यद, मेहताब आयुब नाईक, अब्दुलसत्तार महम्मदसाब नाईक, मोसीन आयुब नाईक यांनी प्रत्येकी एक अर्ज दाखल केला आहे.
प्रभाग क्रमांक सहामध्ये अल्ताफ महमदसाब मदार दोन तर दिलावर दस्तगीर सय्यद, नवीद मजीद अत्तार, झाकीरहुसेन युसुफ नाईक, अब्दुलगफार महमुद मकानदार, शहानुर महमदअली पाच्छापुरे यांनी प्रत्येकी एक अर्ज दाखल केला आहे.
प्रभाग क्रमांक सातमध्ये विद्या विश्वनाथ कांबळे यांनी दोन तर जयश्री गणपती कोलकार यांनी एक अर्ज.
प्रभाग क्रमांक आठमध्ये राजेंद्र गणपती परीट व सचिन सदानंद पिळणकर यांनी प्रत्येकी एक अर्ज.
प्रभाग क्रमांक नऊमध्ये अक्षता महेश निट्टुरकर व नंदिता नंदकुमार घोरपडे प्रत्येकी दोन, अनुसया श्रीकृष्ण दाणी यांनी एक.
प्रभाग क्रमांक दहामध्ये अनिता संतोष परीट यांनी एक अर्ज.
प्रभाग क्रमांक अकरामध्ये गजानन ज्ञानोबा पिळणकर, मोहन नारायण डोणकर यांनी प्रत्येकी एक.
प्रभाग क्रमांक बारामध्ये अस्मानअली अब्बास मुल्ला यांचे दोन तर गफार याकुब शेरखान, फिरोज अब्दुलरशीद मुल्ला यांनी प्रत्येकी दोन अर्ज.
प्रभाग क्रमांक तेरामध्ये माधुरी मारुती कुंभार व हिराबाई कलाप्पा हळीज्वाळे यांनी प्रत्येकी दोन तर स्नेहल संजय कुलकर्णी, कविता किशोर काजिर्णेकर प्रत्येकी एक अर्ज.
प्रभाग क्रमांक चौदामध्ये अमोल शिवानंद हुंबरवाडी व मनोज जयराम हळदणकर यांचे दोन तर गोविंद मनोहर गुरव, विनायक वसंत पाटील यांचे प्रत्येकी एक अर्ज.
प्रभाग क्रमांक पंधरामध्ये रेश्मा मनोज राजापुरकर दोन तर मृणाली दिपक जुळवी, उज्वला विश्वनाथ सुतार, सुजाता सुरेश सातवणेकर, संजीवनी संजय चंदगडकर यांनी प्रत्येकी एक अर्ज.
प्रभाग क्रमांक सोळामध्ये संजीवनी संजय देसाई यांनी एक अर्ज.
प्रभाग क्रमांक सतरामध्ये माधुरी पांडुरंग पवार दोन अर्ज तर सुवर्णा निवृत्ती गुळामकर, मनिषा महादेव आमणगी.
No comments:
Post a Comment