![]() |
झेंडेवाडी (ता. चंदगड) नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वंशजांचा सत्कार करताना शिवेसना जिल्हाप्रमुख विजय देवणे, संग्राम कुपेकर, शेजारी उपजिल्हाप्रमुख प्रभाकर खांडेकर, संज्योती मळवीकर, शांता जाधव आदी. |
झेंडेवाडी (ता. चंदगड) येथे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कुटुंबीयांची भेट घेऊन फेटे, शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या कार्यावर आधारित 'तान्हाजी द अनसंग वॉरियर' हा हिंदी चित्रपट जानेवारी महिन्यात प्रदर्शित होत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेतर्फे मालुसरे यांच्या चंदगड तालुक्यातील वंशजांचा सत्कार करण्यात आला.
अनेक वर्षे दुर्लक्षित राहिलेले मालुसरे कुटुंबीय या सत्काराने भारावून गेले. छत्रपती शिवरायांनी १६७६ च्या सुमारास पारगडचे पहिले किल्लेदार म्हणून तानाजी मालुसरे यांचे पुत्र रायबा यांची नियुक्ती केली. त्यांची समाधी या किल्ल्यावर आहे. तेव्हापासून अकरावे वंशज कै. बाळकृष्ण मालुसरे यांच्यापर्यंतची पिढी गडावर नांदली. त्यांच्यातील एक कुटुंब झेंडेवाडी येथे वास्तव्याला आहे शिवचरित्रातून तानाजी मालुसरे यांच्या कर्तृत्वाचा आढावा घेतला आहेच. परंतु, त्यांच्या शौर्यावर आधारित हिंदी चित्रपट येतोय याचा मनस्वी आनंद आणि अभिमान असल्याची भावना कुटुंबीयांकडून व्यक्त करण्यात आली. यावेळी संग्रामसिंह कुपेकर, उपजिल्हा प्रमुख प्रभाकर खांडेकर, जिल्हा महिलाप्रमुख संज्योती मळवीकर, संघटक शांता जाधव उपस्थित होते. आप्पाजी तानाजी मालुसरे, अरुणा आप्पाजी मालुसरे, रामचंद्र नारायण मालूसरे, ओंकार आप्पाजी मालुसरे यांचा जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या हस्ते हा सत्कार झाला. या सत्काराने मालुसरे कुटुंबीय भारावून गेले.
No comments:
Post a Comment