चंदगड पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपाचे ॲड. अनंत कांबळे यांना संधी - चंदगड लाईव्ह न्युज

11 December 2019

चंदगड पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपाचे ॲड. अनंत कांबळे यांना संधी

ॲड. अनंत कांबळे
नंदकुमार ढेरे / चंदगड
चंदगड पंचायत समितच्या सभापती पून्हा एकदा ॲड. अनंत कांबळे  संधी मिळणार आहे. आज कोल्हापूर येथे  काढण्यात आलेल्या सभापती आरक्षणा सोडती मध्ये अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. या प्रवर्गातील ॲड. कांबळे हे एकमेव उमेदवार असल्याने सभापतीपदी त्यांची बिनविरोध निवड होणार आहे.
चंदगड पंचायत समिती च्या अडीच वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या  यूवक क्रांती आघाडीने आठ पैकी  पाच तर विरोधातील राष्ट्रीय काँग्रेस ने तीन जागा जिंकल्या होत्या.सभापती, उपसभापती पदी यूवक क्रांती आघाडीच्या उमेदवारांना संधी मिळणार असे वाटत असतानाच नाट्यमय घडामोडीत स्वाभिमानाचे जगन्नाथ हूलजी व उपसभापती ॲड. अनंत कांबळे याची वर्णी लागली होती.त्यावेळी राष्ट्रवादी ला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी तालूक्यातील नेत्यानी एकत्र येत एक फार्मूला तयार केला होता.त्यानूसार पंचायत समिती मधील सत्तेचा कार्यकाल ठरविण्यात आला होता.या फार्मूल्यानूसार पहिले वर्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना,दूसरे माजी मंत्री भरमुआण्णा पाटील गटाला,त्यानंतर भाजपला सभापती पद देण्याचे ठरले होते.त्याच पद्धतीने उपसभापती पदाची वाटणी झाली होती.त्यानूसार सभापतीपदी बबनराव देसाई, तर उपसभापतीदी विठाबाई मूरकूटे कार्यरत आहेत. तालुक्यातील सध्याची राजकीय स्थिती पहाता यावेळीही पं.स.मध्ये भाजपचेच सभापती, उपसभापती होणार असल्याचे चित्र आहे. सध्याचे पक्षीय बलाबल असे भरमूआण्णा पाटील पुरस्कृत बबनराव देसाई, मनिषा शिवणगेकर,विठाबाई मूरकूटे,राष्ट्रवादी चे दयानंद काणेकर, रूपा खांडेकर, नंदिनी पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जगन्नाथ हूलजी तर भाजपाचे ॲड. अनंत कांबळे.


No comments:

Post a Comment