चंदगड / प्रतिनिधी
म्हांळुगे (ता. चंदगड) येथील इको केन शुगर (नलवडे) कारखान्याने चालू गळीत हंगामातील गाळप झालेल्या ऊसाला प्रतिटन 2800 रूपये प्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केल्याची माहिती एक्झुकिव्हटीव डायरेक्टर सतीश अनगोळकर यांनी दिली.
इको केन शूगर्स ने नेहमीच योग्य वजन योग्य भाव हे सुत्र वापरले आहे. पुरबधित तसेच वन्य प्राणी बाधित ऊसाला प्राधान्य दिले आहे. शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेऊन कारखाना यापुढेही सर्व बिले वेळेत आदा करणार आहे. हंगामात भागातील शेवटच्या ऊसाचे गाळप होईपर्यंत कारखाना चालू राहणार आहे. त्यामुळे भागातील शेतकऱ्यांनी तालुक्यातील ऊस बाहेर जाणार नाही, याची काळजी घ्यावी असे आवाहन केले. भागातील ऊसाचे वेळेत गाळप व्हावे याठी कारखान्याचे गाळप वाढविले आहे. इतर कारखान्याच्या बरोबरीने आपली शेवटच्या तारखेपर्यंतची सर्व बिले वेळेत आदा करणार आहे अशी माहिती व्यवस्थापक बाबासाहेब देसाई यांनी दिली.
No comments:
Post a Comment