शेतकऱ्यांनी हेमसरच्या प्रशासनावर विश्वास ठेवून ऊस पुरवठा करावा - भरत कुंडल - चंदगड लाईव्ह न्युज

22 December 2019

शेतकऱ्यांनी हेमसरच्या प्रशासनावर विश्वास ठेवून ऊस पुरवठा करावा - भरत कुंडल

हेमरस साखर कारखान्याकडून प्रतिटन २८४५ एकरकमी रक्कम जमा
भरत कुंडल ( हेमरस,बिझनेस हेड)
कोवाड / प्रतिनिधी
यावर्षी कारखान्यांचा गळीत हंगाम वेळाने सुरु झाला असला तरी ओलम (हेमरस) साखर कारखान्याने ४० दिवसात २ लाख ६० हजार टन ऊसाचे गाळप केले आहे . कारखाना कार्यक्षेत्रातील ऊसाची वेळेत उचल करण्याचे नियोजन केले आहे . सध्या पूरग्रस्त पट्ट्यातील ऊसाच्या उचलीवर भर दिला आहे . महापूर आणि अतिवृष्टीचा ऊस पिकाला फटका बसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी गडहिंग्लज विभागात सर्वाधिक दर देण्याचे कारखान्याने नियोजन केले आहे . त्यामुळे शेतकऱ्यांनी हेमरसच्या प्रशासनावर विश्वास ठेवून जास्तीत जास्त ऊस पुरवठा करावा, असे आवाहन हेमसरचे बिझनेस हेड भरत कुंडल यांनी केले आहे.
कुंडल म्हणाले, "हेमरसने आजपर्यंत ऊस दराबाबत शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला. प्रत्येक वर्षी सर्वाधिक दर देऊन शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला आहे. यावर्षीही प्रतिटन २८४५रुपयांची एफआरपीची रक्कम एकरकमी दिली. २५ नोव्हेंबर पर्यंत गाळप झालेल्या ऊसाचे बिल शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केले आहे. २६ नोव्हेंबर ते २५ डिसेंबर पर्यंतचे ऊस बिल जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जमा केले जाणार आहेत. ४० दिवसात २ लाख १८ हजार ८५० पोती साखरेचे उत्पादन केले आहे. त्यामुळे सरासरी ११.१६ इतका साखर उतारा आहे . तोडणी व वाहतूकीची यंत्रणा सक्षम ठेवल्याने कारखान्याचे गाळप अखंडपणे सुरु आहे." ऊस दराबाबत कुंडल म्हणाले, "ऊस दराबाबत हेमरसकडून शेतकऱ्यांची कधीही होणार नाही. आजपर्यंत दिलेला शब्द कारखाना प्रशासनाने पाळला आहे. एफआरपीची रक्कमही शेतकऱ्यांना एकरकमी देत आहोत. गडहिंग्लज विभागातील इतर कारखान्यांपेक्षा हेमरसकडून नक्कीच जादा दर दिला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी याचा विचार करावा. ऊस दरासह कारखान्याकडून शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी अनेक उपक्रम राबविले जात आहेत. सवलतीच्या दरात कृषी पुरक सेवा दिल्या जात आहेत. ऊस उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्याना कारखान्याकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाणार असल्याने उत्पादकानी हेमरसलाच ऊसाचा पुरवठा करावा, असे आवाहन त्यांनी केले.





No comments:

Post a Comment